महागड्या ड्रग्जची चटक… केले असे काही…. 

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन  – सध्याची तरुणाई व्यसनाधीन होत चालली हे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. आता आपली ड्रग्ज ची तलप भागवण्यासाठी  एका २३ वर्षीय तरुणाने चक्क ४३ महिलांच्या सोनसाखळया हिसकावल्याची माहिती मिळाली  आहे. सदर  घटना नागपुरात घडली आहे. अनिल मंगलानी असे या चोराचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात सातत्याने भर रस्त्यावरून चाललेल्या महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्याच्या घटना चालू होत्या. हा सोनसाखळी चोर म्हणजे पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी अशा एका सराईत सोसाखळी चोराला अटक केली आहे. हा चोरटा अत्यंत महाग अमली पदार्थांची नशा करण्यासाठी सोनसाखळी चोरत होता. केवळ अमली पदार्थांची स्वतःची हौस भागवण्यासाठी त्याने आतापर्यंत एक दोन नव्हे तर ४३ महिलांना लुटले आहे.
…आणि ड्रॅग ऍडिक्ट पोलीसानाच्या सापळ्यात – 
अनिलला लहान वयातच ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती . त्याला या ड्रग्जची सवय लागल्यापासून हळूहळू त्याच्यावर ड्रग्जचा परिणाम होऊ लागला . तो ड्रगच्या इतका आहारी गेला की , महागडे ड्रग्ज घेण्यासाठी त्याला पैसे कमी पडू लागले . म्हणून त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला . त्यामुळे त्याने चेनस्नॅचर बनण्याचा मार्ग निवडला. सुरुवातीला तो एखादा दुसराच गुन्हा करायचा. मात्र, हळू हळू दुचाकीवर अत्यंत तीव्र गतीने महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावून पळून जाण्याचा कौशल्य त्याने हस्तगत केला आणि गेल्या काही महिन्यात नागपुरात तब्ब्ल४३ महिलांना लुटले. बऱ्याचदा त्याला अटक ही झाली. मात्र, तुरुंगातून सुटल्यानंतर ही तो पुन्हा-पुन्हा तेच काम करू लागला काल पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली असून त्याने गेल्या एका महिन्यात ११ आणि त्याच्यापूर्वी ३२ गुन्हे अशी एकूण ४२ गुन्ह्यांची कबुली त्याने दिली आहे.
एम डी सर्वात महागडे ड्रग्ज –
ड्रग्ज प्रकारांपैकी सर्वात  महागड्या  नशेपैकी एक म्हणून एमडी ( methylene dioxy methamphetamine) ओळखले जाते . हे तीन ते पाच हजार रुपये प्रति १० ग्राम एवढ्या महाग किमतीला मिळते. खरेतर या अमली पदार्थाला श्रीमंतांचा शौक पुरा करणारा अमली पदार्थ म्हणून ओळखले जाते . हे ड्रग्ज कॅप्सूल पावडर स्वरूपात  उपलब्ध केले जाते. या ड्रग्ज चा परिणाम तीन तासांपर्यंत होतॊ आणि पुढे पुन्हा या ड्रग्जची नशा पुन्हा करावी असे वाटते.  जर ह्या ड्रग्जचा डोस सतत १ आठवडा घेतल्यास चिडचिडेपणा,आवेग आणि आक्रमकता,निराशा,झोपेची समस्या,चिंता,मेमरी लॉस  आणि लक्ष समस्या,भूक कमी या समस्या उद्धभवतात.
काय होतो परिणाम –
मेंदूतील संप्रेरके उत्तेजित करण्याचे काम करते .
ड्रग्ज ही अशी गोष्ट आहे की जे तुमच्या मेंदूची सक्रियेतला अधिक पटीने वाढवते . ज्यामुळे क्षमतेपेखा वरचढ काम शरीराकडून केले जाते.
हार्ट रेट वाढवतो आणि ब्लड प्रेशर देखील वाढते.
सेक्स पॉवर वाढते.