Expert Advice | आतापर्यंत कोरोना बाधित न झालेल्यांसाठी तज्ज्ञांनी सांगितली अत्यंत महत्वाची माहिती, म्हणाले…

नवी दिल्ली (New Delhi) : कोरोना (Corona) संसर्ग सध्या कमी होत आहे. अशी अनेक लोक आहेत की, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. मात्र, आता तिसऱ्या लाटेचे (Third Wave) संकेत देण्यात आहेत त्यामुळे अशा लोकांना तज्ज्ञांनी एक सल्ला (Expert Advice) दिला आहे. त्यांच्या मते ज्या लोकांना अजूनपर्यंत कोरोना झाला नाही अशा लोकांनीही आता कोरोना लस घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीत असे अनेक लोक आहेत की त्यांना अजूनपर्यंत कोरोना झाला नाही त्यामुळे दिल्लीतील (Delhi) भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा लोकांनी कमीत कमी एक तरी डोस द्यावा असे मत तज्ज्ञांनी (Expert Advice) व्यक्त केले आहे.

पुण्याची (Pune) जी स्थिती आहे तीच स्थिती दिल्लीची असल्याचे दिसत आहे. पुण्यात (Pune) करण्यात आलेल्या सीरो सर्वेमध्ये (sero survey) 80 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) होऊन गेल्याचे दिसले आहे. अगदी तशीच स्थिती दिल्लीत (Delhi) असल्याचे सफदरजंग हॉस्पिटलचे (Safdarjung Hospital) कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल (HOD of Community Medicine Dr. jugal) यांनी सांगितले. यापुढे बोलताना ते म्हणाले ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही अशी 10 ते 20 टक्के लोकसंख्या आहे त्यामुळे त्यांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी.

तर धर्मशिला कॅन्सर हॉस्पिटलचे (dharamshila cancer hospital) डॉक्टर अंशुमान कुमार (Dr. Anshuman Kumar) म्हणाले की, सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी सर्वाना कोरोना लस (Corona Vaccine) मिळायला हवी. अद्यापहि वेळ गेलेली नाही. सध्या डेल्टा (Delta) आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटचा (delta plus variant) संक्रमण दर पहायला मिळाला आहे, तो त्रास देऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात कोरोना न झालेल्या लोकांना कमीत कमी एक तरी लसीचा डोस द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Video)

Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पाटसला दुहेरी खून; तलवारीने सपासप वार करून आणि दगडाने ठेचून संपवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Expert Advice | give one shot vaccine who have not been infected corona till date experts say

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update