Tax Planning : ‘या’ फंडांवर वर्षाच्या सुरुवातीला करा गुंतवणूक, टॅक्समध्ये बचतीसह मिळेल मोठा रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही करदात्यासाठी (टॅक्सपेयर) फायनान्शियल प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही करदात्याला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच टॅक्समध्ये मोठी सवलत मिळवण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज असते. काही असे फंड आहेत की त्यामध्ये गुंतवणूक केल्यास बचतीसह मोठा रिटर्नही मिळू शकतो.

सध्या असे काही गुंतवणूक आहेत, त्यामुळे टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स सेव्हिंग प्लॅन गरजेचा आहे. त्याचीच माहिती आपण आता घेणार आहोत.

– इन्शुरन्स प्रीमियमचे पेमेंट, मेडिकल इन्शुरन्स, EPF अंशदान आणि गृहकर्जाच्या हफ्त्यावर टॅक्समध्ये सवलत मिळू शकते.

– जर तुम्ही आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट केले नाही तर आता तुम्ही ELESS फंडात 1,50,000 रुपयांपर्यंत इन्व्हेस्टमेंट करू शकता. तसेच सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्समध्ये सवलतही मिळू शकते.

– ELESS 12-15 % – 3 वर्षे
– नॅशनल पेन्श स्कीम – 9-10 % रिटायरमेंटपर्यंत
– PPF – 7-8 % – 15 वर्षे
– नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट – 7-8 % – 5 वर्षे
– बँक एफडी – 6-7 % – 5 वर्षे

या सर्व माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता तुमच्या टॅक्स लिमिटपेक्षा जास्तीत जास्त कशा पद्धतीने फायदा मिळू शकतो. मात्र, तुम्हाला ELESS फंडात गुंतवणूक करण्यासाठी सतर्क राहावे लागणार आहे.

दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळतोय चांगला रिटर्न
नंतर केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत लवकर केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला जास्त मिळू शकतो. कालावधी वाढल्याने तुम्हाला जास्त वेळ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा. दीर्घकालीन गुंतवणूकीवर चांगला रिटर्न मिळू शकतो.

छोटी गुंतवणूक सर्वात सुविधाजनक
जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केलेल्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीच्या तुलनेत तुम्हाला छोट्या रकमेच्या गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. जर तुम्ही 80C अंतर्गत दरवर्षी 1,50,000 रुपयांच्या टॅक्सवर सूट घेत असला तर त्यानुसार तुम्ही दर महिन्याला 12,000 रुपये गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. SIP च्या माध्यमातून तुम्हाला मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकते.