दुर्देवी ! Corona योद्धा डॉ. चित्तरंजन भावे यांचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

मुंबई : ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले, जेथे कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली. त्याच हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांना उपचारासाठी बेड मिळण्यास १० तास लागल्याचे वास्तव समोर आले आहे. मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ञ डॉ. चित्तरंजन भावे यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉ. भावे हे कान नाक घसा तज्ञ होते. कोरोना च्या कठीण काळात त्यांनी रहेजा हॉस्पिटलमध्ये एका अत्यावस्थ असलेल्या कोरोना रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. पण त्यानंतर त्यांनाच कोरोनाची लागण झाली.

हे समजताच ते स्वत: कार चालवत हॉस्पिटलमध्ये पोहचले. आजवर याच हॉस्पिटलमध्ये डॉ. भावे यांनी अनेकांच्या शस्त्रक्रिया केल्या. याच हॉस्पिटलमध्ये उपचार करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. अशा कोरोना योद्धाला मात्र साधे बेड मिळण्यासाठी १० तास वाट पहावी लागली. चित्तरंजन भावे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर, संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन करण्यात आले आहे.