तज्ज्ञांकडून इशारा !हर्ड इम्यूनिटीच्या विश्वासावर बसू नका, Corona ने फेल केला ‘हा’ फॉर्म्यूला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. ज्यावेळी देशामध्ये कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी हर्ड इम्यूनिटी बाबत अनेक वैज्ञानिकांनी बरीच चर्चा केले होती. त्यावेळी सांगण्यात आले होते की, एखाद्या भागात जास्तित जास्त लोक संक्रमित होतील तेव्हा त्यांच्या शरिरामध्ये अँटीबॉडी तयार होतील. त्यामुळे भविष्यात कोरोनापासून सुरक्षा मिळेल. मात्र, आता तज्ज्ञांनी सांगितले आहे की, कोरोनाचे नवनवीन म्यूटेट्सने या थेअरीला देखील आव्हान दिले आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, हर्ड इम्यूनिटी ज्यावेळी तयार होते तेव्हा लोकांचा मोठा भाग व्हायरस विरोधात इम्यून होतो. याच्या दोन पद्धती आहेत व्हायरसचं संक्रमण किंवा लसीकरण. यामुळे रोगप्रतिकार शक्ती ज्यांच्यामध्ये कमी आहे ते देखील संक्रमणापासून दूर राहू शकतात. कारण जास्त लोकांची इम्यून सिस्टम मजबूत झाल्याने विषाणूपासून संक्रमित होण्याची शक्यता कमी होईल.

हे हर्ड प्रोटेक्शन आहे, हर्ड इम्यूनिटी नाही

पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्रीनाथ रेड्डी म्हणाले की, हे मुळात हे हर्ड प्रोटेक्शन आहे, हर्ड इम्यूनिटी नाही. व्हायरस विरोधात इम्यूनिटी विकसित करु न शकणारी व्यक्ती जर ज्या ठिकाणी व्हायरसचा पसरत आहे. अशा ठिकाणी गेली तर ती व्यक्ती देखील संक्रमित होईल. हर्ड इम्यूनिटी ही लोकसंख्येवर आधारित असून ती व्यक्तींवर आधारीत नाही. रेड्डी यांनी पुढे सांगितले की, आज लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये-जा करत असतात. अशावेळी नॉन इम्यून लोक देखील या विषाणूच्या जाळ्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.

ही लढाई बरीच मोठी

वरिष्ठ महामारी तज्ज्ञ गिरिधर बाबू यांनी सांगितले की, व्हायसर विरोधातील ही लढाई बरीच मोठी चालणारी आहे. त्यामुळे आपल्याला भविष्यात आपली आरोग्यकर्मीचीं मोठी फौज आणि संसाधनांचा भांडार असाच सुरु ठेवावा लागणार आहे. कारण या व्हायरसच्या लाटा पुन्हा आल्या तर त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. ही तयारी जो पर्यंत व्हायरस नष्ट होत नाही तोपर्यंत ठेवावी लागेल. या व्हायरसच्या लढाईत एकमेव मोठं हत्यार कोणतं असेल तर ते लस आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घेतली पाहिजे.

तर दुसऱ्या म्यूटेंटचा धोका

देशामध्ये व्हायरसचे वेगवेगळे व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे. त्या तुलनेत लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर लसीकरणाचा वेग असाच राहिला तर इम्युनिटी डेव्हलप होण्यास वेळ लागेल. कारण व्हायरस हा आपले रुप वेगाने बदल आहे. प्रत्येक म्यूटेशनकडे संक्रमणाची आपली वेगवेगळी पद्धत असते. त्यामुळे अडचण ही आहे की, तुम्ही एका म्यूटेंटने संक्रमित होऊन बरे झाला तरी दुसऱ्या म्यूटेंटने तुम्ही पुन्हा संक्रमीत होऊ शकता.

अँटीबॉडी काही महिन्यात नष्ट होतात

फोर्टिस सी-डॉकचे चेअरमन अनूप मिश्रा म्हणाले, सुरुवातीला असे समजले जात होते की, उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या शरिरात कोरोना प्रति इम्यून तयार होते. मात्र आता तसे काही वाटत नाही. तेच डॉ. रेड्डी म्हणाले, कोरोना विरोधात हर्ड इम्यूनिटीचं प्रमाण काय हे ठरु शकलेलं नाही. मात्र, इतके नक्की माहीत आहे की, संक्रमणानंतर त्याच्या शरिरात अँटीबॉडी तयार होतात. त्या काही महिन्यात नष्ट होतात.

लसीकरण हा योग्य पर्याय

डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, कोरोनपासून सुरक्षा मिळवण्यासाठी चांगला पर्याय कोणता असेल तर तो आहे लसीकरण. वॅक्सिनचा दुसरा डोज घेताच शरीरात मोठ्या प्रमाणात एंटिजेन तयार होतात. अँटीबॉडी सर्व्हेच्या आधारानुसार, आपण हर्ड इम्यूनिटी विकसित केली हा गैरसमज आहे. आम्ही वर्षभरापूर्वीच हर्ड इम्यूनिटीच्या भ्रमासंदर्भात इशारा दिला होता.