Aadhaar Card हरवल्यास आता कुठंही जाण्याची गरज नाही, फक्त करावं लागेल ‘हे’ काम, 15 दिवसात मिळेल घरपोच, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आधार कार्ड खराब झाले, हरवले तर ते आता रिप्रिंट करणे सोपे झाले आहे. काही नियमांचे पालन करून तुम्ही हे पुन्हा बनवू शकता. सरकारने तशी व्यवस्था केली आहे. युआयडीएआयने याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. नवे आधार कार्ड पाहिजे असेल तर युआयडीएआयच्या वेबसाइटवर जाऊन नवीन प्रिंटसाठी ऑर्डर करावी लागेल. संस्थेने दावा केला आहे की, आतापर्यंत 60 लाख भारतीय नागरिकांनी ऑर्डर आधार रिप्रिंट सर्व्हिसचा लाभ घेतला आहे. दाव्यानुसार 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने रिप्रिंटेड आधार कार्ड डिलिव्हरी करण्यात आले.

युआयडीएआयची वेबसाइट आणि एमआधार दोन्हीच्या माध्यमातून आधार रिप्रिंट करता येते. आधार रिप्रिंट करण्यासाठी अ‍ॅप्लाय करण्यासाठी आधार कार्ड धारकाकडे आपला आधार नंबर किंवा वर्चुअल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे व्हीआयडी असेण आवश्यक आहे. जर तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये रजिस्टर नसेल तरीसुद्धा तुम्ही आधार रिप्रिंट करू शकता. यामध्ये नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवण्याचे ऑपशन आहे.

आधार रिप्रिंट करण्यासाठी 50 रुपये चार्ज द्यावा लागेल. यामध्ये जीएसटी आणि स्पीड पोस्ट चार्ज आहे. रिप्रिंटेड आधार लेटर स्पीड पोस्टच्या माध्यमातून 15 दिवसांच्या आत आधार कार्ड धारकाच्या रजिस्टर्ड पत्त्यावर पाठवले जाईल.

जाणून घ्या आधार रिप्रिंटची पूर्ण प्रोसेस

1  युआयडीएआयच्या वेबसाइटच्या आधारे रिप्रिंटसाठी सर्वात अगोदर तुम्हाला www.uidai.gov.in वर ‘माय आधार सेक्शन’ मध्ये जाऊन ‘ऑर्डर आधार रिप्रिंट’ वर क्लिक करावे लागेल.

2  यानंतर उघडलेल्या पेजमध्ये आधार नंबर किंवा व्हीआयडी आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. जर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तर तो सेंड ओटीपीवर क्लिक करा.

3  जर मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसेल तर नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरच्या बॉक्समध्ये क्लिक करा आणि मोबाइल नंबर टाका. यांनतर सेड ओटीपीवर क्लिक करा.

4  मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा आणि टर्म्स अँड कंडीशन्स वाचून बॉक्समध्ये टिक करून अ‍ॅग्री करा. यानंतर आधार रिप्रिंटचा एक प्रीव्ह्यू शो होईल. परंतु, नॉन-रजिस्टर्ड मोबाइल नंबरवाल्यांसाठी प्रीव्ह्यू उपलब्ध नाही.

5  प्रीव्ह्यूमध्ये डिटेल्स चेक केल्यानंतर ‘मेक पेमेंट’ वर क्लिक करा. तुम्ही क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/युपीआय किंवा नेटबँकिंगच्या मदतीने पेमेंट करू शकता.

6  पेमेंट केल्यानंतर रसीद नंबर, एसआरएन, पेमेन्टची डेट आणि टाईम, ट्रांजक्शन आयडी, यासारख्या डिटेल्स डिस्प्ले होतील. यामध्ये एक्नॉलेजमेंट स्लिप डाऊनलोड करण्याचा सुद्धा ऑपशन असेल. एसआरएन नंबर नोट करा. टाकलेल्या मोबाइल नंबरवर एसआरएन डिटेल्ससह एसएमएस सुद्धा येईल.

7  स्टेटससुद्धा करू शकता चेक

आधार कार्ड रिप्रिंटसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्ही तुमच्या अ‍ॅप्लीकेशनचे स्टेटससुद्धा चेक करू शकता. युआयडीएआयच्या वेबसाइटवर ‘माय आधार सेक्शन’ मध्ये ‘ऑर्डर आधार रिप्रिंट’ पर्यायाच्या अगदी खाली ‘चेक आधार रिप्रिंट स्टेटस’ पर्याय उपलब्ध आहे.

8  डायरेक्ट https://resident.uidai.gov.in/check-reprint-status च्या द्वारे सुद्धा यास अ‍ॅक्सेस करता येते. आधार रिप्रिंट स्टेटस चेक करण्यासाठी दिलेल्या स्पेसमध्ये एसआरएन, आधार नंबर आणि कपाचा टाकून चेक स्टेटसवर क्लिक करा. यानंतर आधार रिप्रिंटचे स्टेटस समोर येईल.