RBI च्या खजिन्यात नेमकी किती रक्कम ? किती अतिरिक्त फंड ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या रिझर्व बँकेने सरकारला 1.76 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. आर बी आय कडून सरकारला दिली जाणारी आतापर्यंतची हि सर्वात जास्तीची रक्कम आहे. माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या कमिटीने मांडलेले मुद्दे आर बी आय कमिटीने मान्य केल्या आहेत.

या 1.76 लाख करोड़ मधील 1.23 लाख करोड़ रुपये वर्ष 2018-19 च्या सरप्लस (अधिशेष) रूपामध्ये आणि 52,637 करोड़ रुपये रिझर्व मधून दिले जाणार आहेत.

जाणून घेऊयात रिझर्व बँकेत नेमका किती आहे अतिरिक्त फंड –

रिझर्व बँकेच्या 2017-18 च्या आकड्यानुसार, बँकेत 36.2 लाख करोड रुपये आहेत. रिझर्व बँकेचे खाते हे एखाद्या कंपनीप्रमाणे नेहमीच फायद्यात नसते. बँक जेवढ्या पण नोटा छापते त्याच्या अर्ध्याहून जास्त रक्कम ही कर्ज फेडणाऱ्या देणेदारांसाठी जाते. एकूण फंडांपैकी 26 % रक्कम ही बँकेत अतिरिक्त फंड म्हणून असते. हे अतिरिक्त फंड पैशांच्या तसेच सोन्याच्या स्वरूपातही असते. रिजर्व बँकेकडे जवळ जवळ 566 टन इतके सोने आहे.

किती आहे रिजर्व फंड –

रिझर्व बँकेकडे दोन प्रकारचे रिझर्व फंड असतात. करेंसी आणि गोल्ड रीवैल्यूएशन अकाउंट (CGRA) तसेच कॉन्ट‍िजेंसी फंड म्हणजेच आपत्कालीन निधी. रिझर्व मध्ये सगळ्यात जास्त हिस्सा CGRA चा असतो. 2017-18 मध्ये 6.9 लाख करोड़ रुपये होते. 2017-18 साली रिझर्व बँकेत 2.32 लाख करोड़ रुपये होते.

रिजर्व बँकेचा अतिरिक्त फंड म्हणजे नेमकं काय –

रिझर्व बँकेचा अतिरिक्त फंड हा सरकारला देण्यासाठी असतो. सर्व खर्च करून रिजर्व बँकेकडे जो पैसा शिल्लक राहतो तो अतिरिक्त फंड म्हणून वापरला जातो. रिझर्व बँकेने 2017-18 मध्ये 14,200 करोड़ रुपये कॉन्टिजेंसी फंड साठी निश्चित केले होते. जितकी जास्त या फंडाची तरतूद केली जाते, रिझर्व बँकेचा अतिरिक्त फंड तितकाच कमी असतो. वर्ष 2018-19 मध्ये रिझर्व बँकेने 1,23,414 करोड़ रुपये इतका अतिरिक्त फंड देण्याचे निश्चित केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –