Indian Railways ची घोषणा ! ठरलेल्या वेळातच होतील ‘रेल्वे भरती परीक्षा’, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळे भारतीय रेल्वे (Indian Railways) ने परीक्षा रद्द होणे किंवा पुढे ढकलण्याशी संबंधित सर्व आशंका संपवल्या आहेत. रेल्वे भरती परीक्षा (Railway Recruitment Examinations) वेळेवर होणार असल्याचा स्पष्ट संदेश भारतीय रेल्वेने दिला आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव (VK Yadav) यांनी सांगितले की, आयसोलेड आणि मिनिस्ट्रियल कॅटेगरीच्या स्टेनो व टीचर्सच्या 1663 पदांसाठी संगणक आधारित टेस्ट (Computer Based Test) 15 ते 18 डिसेंबर रोजी घेण्यात येईल. या पदांसाठी रेल्वेने 1.03 लाख अर्ज (Applications) स्वीकारले आहेत.

जून 2021 पर्यंत इंडियन रेल्वे लाखो पदांची भरती करेल
भारतीय रेल्वेने म्हटले आहे की नॉन टेक्निकल कंप्यूटर कॅटेगरी (NTPC) च्या 35,208 पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) 28 डिसेंबर ते मार्च 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. यामध्ये स्टेशन मास्टर्स (Station Masters), गार्ड्स (Guards), ऑफिस लिपिक (Office Clerk), कमर्शियल लिपिक (Commercial Clerk) या पदांच्या भरतीचा समावेश आहे. या पदांसाठी रेल्वेला 1.26 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या व्यतिरिक्त ट्रॅक मेंटेनर्स, पॉईंट मॅन आणि लेव्हल 1 स्तर सहित इतर अनेक पदांसाठी देखील सीबीटी परीक्षा एप्रिल ते जून 2021 दरम्यान घेण्यात येणार आहेत. या कॅटेगरी अंतर्गत 1,03,769 पदांची भरती होणार असून त्यासाठी 1.15 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.

सहाय्यक लोको पायलट ट्रेनिंग ऑगस्ट 2020 पर्यंत होईल पूर्ण
कोविड -19 आणि लॉकडाऊनमुळे सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilots) साठी निवडलेल्या हजारो उमेदवारांचे प्रशिक्षण (Training) थांबविण्यात आले होते. हे उमेदवार सतत प्रशिक्षण करून जॉईन करण्याबाबतची मागणी करत होते. आता रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव यांनी सांगितले आहे की या सर्व उमेदवारांना नियुक्ती पत्र (Appointment Letter) पाठवण्यात आले आहे. त्यांनी घोषणा केली आहे की सर्व निवडलेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने ऑगस्ट 2021 पर्यंत प्रशिक्षण दिले जाईल.