कारखान्यातील भीषण स्फोटात मालकाचे निधन : कर्मचारी बचावले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

अल्युमिनियमची भांडी बनवणाऱ्या के. एस. चव्हाण इंडस्ट्रीजमध्‍ये फर्नेस ऑईलच्या झालेल्या गळतीत भीषण स्फोट झाला. यामध्ये कारखान्याचे मालक नरसिंहराव कृषणराव चव्हाण यांचे निधन झाले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e1be214b-ad21-11e8-8e52-8dd7b8e6d4ef’]

याबाबत अधिक माहिती अशी की, वाय. पी. पोवार नगरातील अल्युमिनियमची भांडी बनवणाऱ्या के. एस. चव्हाण इंडस्ट्रीजमध्‍ये शुक्रवारी सकाळी फरनेस ऑईलचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटा मध्ये कारखान्याचे मालक नरसिंहराव कृषणराव चव्हाण (वय ६२, रा.टाकाळा) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र आगीमध्ये भाजल्याने उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे कारखान्यातील कामगारांना या घटनेची चाहूल लागताच बाहेरच्या दिशेने धाव घेतली यामुळे होणारी मोठी दुर्घटना टाळली.

आता एवढेच बाकी होते … गुगल शिकवणार शास्त्रशुद्ध शेतीचे धडे ?