तामिळनाडूमधील नेयवेली उर्जा प्रकल्पात 6 ठार; 17 जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :  तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नेयवेली लिग्नाइट उर्जा प्रकल्पातील ब्वॉयलर स्टेज-2 मध्ये झालेल्या स्फोटात 6 जण ठार झाली असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना एनएलसी लिग्नाईट रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही.

कुड्डालोरमध्ये नेयवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनच्या एका बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. एनएलसीकडे स्वत: चे अग्निशमन दल आहेत जे स्फोटानंतर बचावकार्यात गुंतले आहेत. यासह कुड्डालोर जिल्हा प्रशासनातील बचाव दलही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, कुड्डालोर हे राजधानी चेन्नईपासून 180 कि.मी. अंतरावर आहे. सात युनिट्समध्ये 1,470 मेगावॅट वीज निर्मित केली जाते. एका बॉयलरचा स्फोट झाला, ज्यामुळे प्रचंड आग लागली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.