पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाण पुलाखाली स्फोटाने खळबळ ! एकाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. उजळाईवाडी येथील उड्डाण पुलाखाली एका बेवारस वस्तुला लाथ मारल्याने त्याचा स्फोट होऊन त्यात एकाचा मृत्यु झाला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दत्ता गणपती पाटील (वय ५५, रा. जाधववाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

पुणे-कोल्हापूर महामार्गावरील कोल्हापूर शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर उजळाईवाडी येथे हा उड्डाणपुल आहे. उड्डाणपुलाखाली एक बेवारस वस्तू पडलेली होती. पुलाखाली पार्क केलेल्या ट्रकजवळ दत्ता पाटील हे उभे होते. त्यांनी त्या बेवारस वस्तूला लाथ मारली. त्याबरोबर त्याचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्यांचे दोन्ही पाय पूर्णपणे भाजले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथील सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन तपास करण्यास सुरुवात केली आहे. हा स्फोट कशाचा होता. बॉम्बस्फोट करुन उड्डाण पुलाला हानी पोहचविण्याचा डाव होता का, याची तपासणी बॉम्बशोधक व नाशक पथक करीत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी