पुन्हा एकदा डोंबिवली हादरली

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन

दोन वर्षांपूर्वी डोंबिवली शहाराचा पूर्व भाग प्रोबेस कंपनीच्या स्फोटामुळे हादरला होता. या हादऱ्याच्या आठवणी ताज्या असतानाच याच भागात पुन्हा स्फोटामुळे हादरून गेला आहे. डोंबिवली-शहराच्या पूर्व भागात सागांव येथील आर्च फार्मा कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये आज पहाटे दोन वाजता स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनी परिसरातील इमारतीना जबरदस्त हादरा बसला. या स्फोटात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी स्फोटामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. अवघ्या दोन वर्षात पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षिततेची काळजी कंपन्या घेत नसल्याची बाब सामोर आली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6d94aa8a-ba66-11e8-9b54-35a09da722dc’]

औषधे उत्पादनासाठी लागणारा कच्च माल आर्च फार्मा कंपनीत तयार केला जातो. कच्च्या मालावर प्रक्रिया सुरु असताना रिअॅक्टरमध्ये पहाटे दोन वाजता स्फोट झाला. रिअॅक्टर क्लीनींग करण्याचे काम सुरु होते. त्याच वेळी हवेचा दाब रिअॅक्टरमध्ये वाढला. त्यामुळे हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराला त्याचा मोठा हादरा बसला. शेजारी इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना वाटले की, त्यांच्या शेजारची इमारत पडली आहे. काही नागरींना भूकंप झाला असल्याचे वाटले. पहाटे दोन वाजता भयभीत झालेले नागरीक घराबाहेर आले तर शेजारच्या कंपनीत स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या स्फोटात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. कंपनीच्या इमारतीचा सज्जा स्फोटामुळे कोसळून पडला आहे.

यापुढे भाजपचा प्रचार करणार नाही : रामदेव बाबा

कंपनीतील सुरक्षा अधिकारी राजेश भगत यांनी कंपनीत स्फोट झाला असल्याचे मान्य केले आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. रिअॅक्टरची क्लीनिंग सुरु असताना हवेचा दाब वाढल्याने हा स्फोट झाला आहे.