पालघरमध्ये सापडली स्फोटके, मुंबईत सतर्कतेचा इशारा

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. देशात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली असताना पुन्हा पालघरमध्ये २४ डिटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडल्याने खळबळ उडाली आहे. २१ फेब्रुवारी रोजी कर्जतम येथे बसमध्ये आयईडी सापडले होते. त्यानंतर या प्रकाराने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात हाय अलर्ट देण्यात आला होता. सागरी मार्गाने येऊन घातपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर कर्जत येथेही एका एसटी बसमध्ये स्फोटकं सापडल्याने खळबळ उडाली होती. त्याचा तपास पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर आता पुन्हा पालघरमध्येच २४ डिटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी स्फोटकं ताब्यात घेतली आहेत. त्यानतंर तपासाला सुरुवात केली आहे.  राज्यात घातपाताची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे.

पुलवामानंतर जम्मू काश्मीर बाहेरही दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच मुंबईतील लाईफलाईनलाही धोका असल्याने मुंबईत रेल्वे स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आली आहे. त्यानंतर ही स्फोटकं सापडल्याने मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.