‘कोरोना’च्या काळात ड्रॅगननं भारतातून केली प्रचंड खरेदी, चीनमध्ये निर्यात 78 टक्क्यांनी वाढली

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत-चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात चीनी वस्तूंवर बहिष्कारासाठी अभियान सुरू आहे. तर, दुसरीकडे चीनने भारतीय वस्तूंची जोरदार आयात केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये चीनसाठी भारतीय वस्तूंची निर्यात 78 टक्के वाढली आहे.

क्रिसिल रिपोर्टमधून याबाबत माहिती मिळते. एप्रिल महिन्यात यामध्ये 60.2 टक्केची घसरण झाली होती. जुलैमध्ये सुद्धा ही 10 टक्के वाढली आहे. ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणात आहे, तेथील अर्थव्यवस्थेसाठी निर्यात वाढली आहे. चीनशिवाय भारतकडून दुसर्‍या आशियाई देशांत सुद्धा निर्यात वाढली आहे. भारत आपल्या एकुण निर्यातीच्या 16 टक्के निर्यात आशियाई अर्थव्यस्थेत करतो.

या प्रमुख अर्थव्यवस्थेत घटली निर्यात
या यादीत मलेशिया, व्हिएतनाम आणि सिंगापुर आहे. या तिनही देशांमध्ये भारतीय वस्तूंची निर्यात अनुक्रमे 76 टक्के, 43 टक्के आणि 37 टक्के आहे. या देशांना कोरोना व्हायरस महामारीत बर्‍याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तर, दूसरीकडे पश्चिमी अर्थव्यवस्थांमध्ये भारताची निर्यात कमी झाली आहे. ज्या देशांमध्ये भारताची निर्यात घटली आहे, त्यामध्ये अमेरिका, ब्राझील, युनायटेड किंगडम या देशांचा समावेश आहे. येथे कोरोना व्हायरस संक्रमणाची प्रकरणे सतत वाढत आहेत.

चीनला मिळाला कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवल्याचा फायदा
क्रिसिल रिपोर्टमधून समजले की, त्या देशांमध्ये निर्यात वाढेल जेथे कोरोना व्हायरसची प्रकरणे कमी होत आहेत आणि आर्थिक हालचाली सुरू होत आहेत. याबाबतीत चीन जगातील सर्वात चांगले उदाहरण आहे.

व्यापारातील तोटा कमी करण्यात मदत
चीनमध्ये भारतीय वस्तूंच्या निर्यातीचे प्रमुख कारण आयर्न, स्टील, अभ्रक आणि जैविक पदार्थांची मागणी होती. मात्र, चीनकडून आयात कमी स्थानिक मागणीमुळे घटली आहे. तर, चीनी वस्तुंच्या आयातीवर प्रतिबंध लावले गेल्याने सुद्धा या आकड्यांमध्ये घट झाली आहे. या दोन्ही आकड्यांमुळे भारताच्या व्यापार तोट्यात घट झाली आहे.