पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोमोजमध्य स्टॅपलरची पीन असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी पोलीस असल्याचे सांगत हॉटेलचालकाकडून २० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

धनाजी दळवी (वय २७, रा. मुरबाड, ठाणे), अभिजित उत्तेकर (वय २७, रा. खडकपाडा, कल्याण), समीर वडवले (वय२५, रा. मुरबाड, ठाणे) आणि परेश पाटील (वय२४, रा. चेंबूर, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धनाजी पाटील याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, धनाजी दळवी हा हाऊस ऑफ मोमोज या हॉटेलमध्ये पोलिसाच्या गणवेशात आला व त्याने खाण्याचे पार्सल खरेदी केले. त्या पार्सलमध्ये स्टॅपलरची पिन टाकून याने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याचे तीन साथीदार तेथे आले. त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या. कारवाई करु नये, यासाठी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांनी ७ हजार रुपये घेतले. त्याचवेळी तेथे दबा धरुन बसलेल्या नौपाडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

आरोग्यविषयक वृत्त –