बोधगया येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! ४ मुलींसह एकाला अटक

बोधगया : वृत्तसंस्था – भगवान बुद्धांची नागरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बोधगया येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान दरम्यान पोलिसांनी ४ मुली आणि एका युवकास अटक केली. या सर्वांवर लैंगिक रॅकेट चालवल्याचा आरोप आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल बोधगया रेजेंसी येथे वेश्या व्यवसायाचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती गया पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणले. या सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या ४ मुली आणि १ मुलाला पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतले. सेक्स रॅकेटमध्ये वापरलेली पाच वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत ज्यात ४ चारचाकी वाहने आणि एका मोटारसायकलचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितली स्टोरी :
यासंदर्भात बोधगया पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयशंकर प्रसाद म्हणाले, हॉटेल बोध गया रेजेंसीमध्ये काही काळापासून देह व्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आम्ही या हॉटेलवर छापा टाकला आणि ५ जणांना अटक केली ज्यात ४ मुलींचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की त्यांनी हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी एका खोलीत ४ तरुण उपस्थित होते, परंतु त्यातील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आणि एकाला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी FIR नोंदविली आहे आणि हॉटेलमधून पळून गेलेल्या तिन्ही तरुणांचा जोरदार शोध घेत आहेत. हॉटेलमधून पळून गेलेल्या आणि या रॅकेटमध्ये सामील झालेल्या तरुणांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Visit : policenama.com