चढया दराने रेमडेसिवीरची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा सख्ख्या भावांना आणि त्यांच्या मैत्रीणीचा पर्दाफाश; तिघे बी-फार्म Pass

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  काळ्या बाजारात चढ्या दराने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा सख्या मावस भावांना आणि त्यांच्या मैत्रीणीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. तरुण-तरुणी बी-फार्मसी शिक्षण झालेले आहे.

निखिल बाबुराव जाधव (वय 24, रा. आंबेगाव पठार) व मयूर विजय चव्हाण (वय 22, रां वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर शामली अकोलकर हिच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा गेल्या काही दिवसापासून काळा बाजार सुरू आहे. चढया दराने या इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलीस या काळा बाजारावर रोख लावत आहेत. या दरम्यान गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक (1) हे गस्त घालत असताना कर्मचारी राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना नवले पूल परिसरात या इंजेक्शनची विक्री केली जाणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार केले आणि त्यांच्याकडे इंजेक्शन खरेदीसाठी पाठवले. त्यावेळी शामली ही तरुणी दोघांमार्फत इंजेक्शन विक्री करताना समोर आले. त्यांनी 37 हजार रुपयांना एक असे 1 लाख 5 हजार रुपयांना तीन इंजेक्शन देण्याचे ठरविले. त्यानुसार इंजेक्शन घेताना या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर त्या तरुणीला आज ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे 3 इंजेक्शन, कार आणि मोबाईल असा 8 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान हे इंजेक्शन नोव्हेंबर 2020 मधील आहेत. त्यामुळे ते शासकीय रुग्णालयातुनच मिळाले असावे असा संशय आहे. त्यांनी हे इंजेक्शन फॉर्म भरून मिळवले असण्याची शक्यता आहे.