द्रुतगती मार्गावर बोरघाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ रविवारी पहाटे दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही. दरड बाजूला करण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

लोणावळा व खंडाळा घाट परिसरात शनिवार पासून जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत वारा देखिल असल्याने खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती महामार्गावर आला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक मंदावली होती. घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला घटनास्थळावर दाखल झाली असून मार्गावरील दरड बाजुला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याकामाकरिता मुंबईकडे जाणारी वाहतुक थांबविण्यात आली आहे. मागील दोन तिन वषार्पुर्वी याच भागात मोठ्या दरडी पडल्याने कोट्यावधी रुपये खर्च करत याभागातील डोंगराला सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. तरी देखील दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना प्रवाश्यांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.

सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे खंडाळा गावठाण येथे वड व गुलमोहराचे झाड एका गाडीवर पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही. लोणावळा परिसरात काल पासून पावसाचा जोर वाढला आहे, त्यातच शनिवारी रात्री पावसाच्या सोबत वारा देखील राहिल्याने खंडाळ्यात दोन मोठी झाडे पडली आहेत.

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार