लाखो प्रवाशांना ‘दिलासा’ ! ‘एसटी’ प्रवासभाडे सवलतीसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यास ‘मुदतवाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांना एसटी प्रवासभाडे सवलत राबवण्यात येत आहे. त्यासाठी स्मार्टकार्ड योजना बंधनकारक करण्यास 1 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. या संदर्भात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विविध लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिकांनी परिवहन मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढीची मागणी केली होती.

1 जानेवारी 2019 पासून स्मार्टकार्ड योजना सुरु करण्यात आली असून सद्यस्थितीत 30 लाख 97 हजार 726 जणांची नोंदणी झाली आहे. या योजनेत 31 डिसेंबर 2019 पर्यंत ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्तांना स्मार्टकार्ड मिळणे आवश्यक होते. नोंदणीचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने नागरिकांकडून आणि लोकप्रतिनिधीकडून मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्याला मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

हे स्मार्ट कार्ड 31 डिसेंबर 2019 पर्यंत देणे आवश्यक होते. परंतु ही मुदत आता वाढून 31 मार्च 2020 करण्यात आली आहे. तसेच 1 एप्रिल 2020 पासून स्मार्टकार्ड असणे बंधनकारक असणार आहे.

मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड 15 फेब्रुवारी 2020 पासून बंधनकारक करण्यात येत आहे. शिवाय 1 जून 2020 पासून विद्यार्थ्यांना हे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येईल. दिव्यांगाना ही स्मार्ट कार्ड योजना लागू करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगासाठी सध्यास्थितीत असलेलीच कार्यपद्धत लागू राहिलं. सरकारच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की सर्वांनी दिलेल्या कालावधीत स्मार्टकार्ड बनवून घ्यावे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/