10 वीच्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी, बोर्ड परीक्षेचा फाॅर्म भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इयत्ता दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी यापूर्वी २३ डिसेंबर ते ११ जानेवारी अशी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १२ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. दोन वेळा मुदतवाढ देऊनही अजूनही काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे आता तिसऱ्यांदा मुदत वाढवली आहे. २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहे.

दहावी परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह दि. ३ ते १३ फेब्रुवारी या दरम्यान अर्ज करता येईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज भरावीत. माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची अर्ज भरून समबीट केल्यानंतर त्यांना शाळा लाॅगईनमधून प्रे-लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली. शाळांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जातील सर्व माहिती पडताळणी करून अचूक असल्याची खात्री करावी. ही शेवटची मुदतवाढ असेल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.