Extension For General Transfers In Maharashtra | पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांना मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Extension For General Transfers In Maharashtra | पोलिस अधिकारी (Maharashtra Police Officers) तसेच सर्वच शासकीय अधिकारी (Maharashtra Govt Officers) व कर्मचार्यांच्या बदल्यांना 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज काढले आहेत.
पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या सालाबादाप्रमाणे सधारण एप्रिल ते मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. मात्र, सन 2023-24 या चालू आर्थिक वर्षातील दि. 31 मे 2023 पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. 30 जून 2023 पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
पोलीसनामा ऑनलाइनने पोलिस निरीक्षकांच्या बदल्या महिन्याभर रखडणार याबाबतचे वृत्त रविवारी (दि. 28 मे) दिले होते. ते वृत्त अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. आता सर्वच शासकीय अधिकरी आणि कर्मचार्यांना बदल्यांसाठी दि. 30 जून 2023 पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Web Title : Extension For General Transfers In Maharashtra | Extension For General Transfers Of Maharashtra Police Inspectors And Govt Officers
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Prakash Ambedkar | ‘…म्हणून छगन भुजबळ यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा’, प्रकाश आंबेडकरांची मागणी