३ हजार रुपयाची लाच घेताना विस्तार अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – ३ हजार रुपयाची लाच स्विकारताना गेवराई पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्याला बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज पंचायत समितीमध्ये करण्यात आली. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली आहे.

विनायक भास्करराव येळंबकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका शेतकऱ्याने बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांच्या शेतातील बांध बंदिस्तीच्या फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये तीन हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (दि.२६) तक्रार केली होती. पथकाने आज लाचेच्या मागणीची तक्रारीची पंचासमक्ष पडताळी केली. त्यावेळी विस्तार अधिकारी याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पंचायत समितीमध्ये पथकाने सापळा रचून विनायक येळंबकर याला तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयाची लाच स्विकाराताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक गजानन वाघ, पोलीस शिपाई कल्या राठोड, मनोज गदळे, भरत गारदे, चालक गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

महत्वाच्या बातम्या –

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं 

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ? 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या 

भारताची 2 विमानं पाडली, 1 वैमानिक ताब्यात, पाकचा दावा