अधिवेशन कालावधीत नागपूरात शस्त्रसाठा सापडल्याने प्रचंड खळबळ

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन

एक रायफलसह तीस जिवंत काडतूस सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका कार मध्ये हा शस्त्रसाठा सापडल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली.  शहरात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून, राज्यातील अनेक व्हिआयपी व्यक्ती शहरात आहेत. त्यामुळे शहराची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असताना देखील मोठा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला आहे.

[amazon_link asins=’B07F83WRJS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfe48825-8bf1-11e8-b1e6-93d8dd4fa8cd’]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागपूर पोलिसांना आपल्या खबऱ्यामार्फत एका कारमध्ये शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी सापळा रचून तिघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. नेमकी ही शस्त्र शहरात कशासाठी आणली होती. याचा तपास पोलीस करीत आहेत.