Extortion Case against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह, इतर 6 पोलिसांसह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Extortion Case against IPS Officer) दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे (Sachin Waze) यांच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटबॉम्बनंतर राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तर अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता परमबीर सिंह यांच्याविरोधात यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा (Extortion Case against IPS Officer) दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. दरम्यान, परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner) असताना मलबार हिल (Malabar Hill, Mumbai) परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचे भाडे दिले नसल्याचा (not paid rent) त्यांच्यावर आरोप आहे. परमबीर सिंह यांनी 24 लाख रुपये भाडे थकवल्याचा आरोप आहे.

 

राज्य सरकारचे ACB ला आदेश

मागील आठवड्यात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (Anti Corruption Bureau) आदेश दिले होते. परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्यास राज्य सरकारने (State government) एसीबीला सांगितले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) दोन अधिकाऱ्यांनी सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने एसीबीला तक्रारींचीबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते.

ईडीच्या रडावर परमबीर सिंह
परमबीर सिंह हे देखील ईडीच्या (ED) रडारवर आले आहेत. त्यांची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती समोर लाई आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी परमबीर सिंह यांना लवकरच चौकशीला बोलावणार असून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना याबद्दल समन्स (Summons) सुद्धा बजावण्यात आले आहे.

Web Title :- Extortion Case against IPS | extortion case registered against ips officer and dg home guard parambir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी