Extortion Case | खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण, 7 जणांची टोळी गजाआड

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्भपाताच्या गोळ्यांचे किट (MTP kit) असलेले औषधांचे पाकीट दुकानात ठेवल्याने खुनाचा (Murder) गुन्हा (FIR) दाखल होऊ शकतो, अशी भीती दाखवली. तसेच धमकी देऊन 5 ते 6 लाख रुपयांची खंडणीची Extortion Case मागणी केली. खंडणीसाठी मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले (Medical professional kidnapped for extortion). याप्रकरणी टायगर ग्रुपचा (Tiger Group) अध्यक्ष, होमगार्ड (Homeguard) आणि ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यासह 7 जणांना अटक केली आहे. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अटक करण्यात आलेले आरोपी (arrested accused)
सिद्धार्थ भारत गायकवाड (वय-32), प्रितेश बबनराव लांडगे (वय-30), राहुल छगन लोंढे (वय-24), प्रकाश मधुकर ससगाणे (वय-31), कमलेश राजकुमार बाफना (वय-32), संतोष बापु ओव्हाळ (वय-28 सर्व रा. वाकड), आकाश विजय हारकरे (वय-27 रा. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहेत. याप्रकरणी अशोक बेलीराम आगरवाल Ashok Beliram Agarwal (वय-23 रा. विकास नगर, किवळे, देहुरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपींना न्यायालयात (Court) हजर केले असता त्यांना 19 जून पर्यंत पोलीस कस्टडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.

खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threatened to file a murder charge)
आरोपी (Accused) हे संगनमत करुन फीर्यादी यांच्या डांगे चौकातील (Dange Chowk) स्पंदन हॉस्पिटलमधील (Spandan Hospital) मेडिकलमध्ये (Medical) आले.
आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करुन मेडिकलमधील कपाटातील एमटीपी किट (MTP kit), औषधाचे पाकीट व दोन फाइल ताब्यात घेतले.
या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास तुमच्यावर खुनाचा (Murder) गुन्हा (FIR) दाखल होऊ शकतो.
सर्व हॉस्पिटलला येरवडा कारागृहाची (Yerawada Jail) हवा खावी लागेल,
अशी भीती दाखवली. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी यांना चारचाकीमधून बसवून (kidnapped) घेऊन गेले.
तसेच फिर्यादी आणि डॉ. खरे (Dr.Khare) यांना जिवे मारण्याची धमकी देऊन एका तासात 5 ते 6 लाख रुपयांची मागणी केली.

आरोपी टायगर ग्रुपचा शहराध्यक्ष (Accused Tiger Group City President)
वाकड पोलिसांनी ((Wakad Police Station) अटक (Arrest) केलेल्या आरोपींपैकी सिद्धार्थ भारत गायकवाड हा टायगर ग्रुपचा (Tiger Group) पिंपरी चिंचवड अध्यक्ष (Pimpri Chinchwad President) आहे. तर संतोष बापु ओव्हाळ हा उपाध्यक्ष (Vice President) आहे. तर प्रितेश बबनराव लांडगे हा महाराष्ट्र गृहसुरक्षा रक्षक दलाचा (Maharashtra Gruhasuraksha Rakshak Dal) कर्मचारी (employee) असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मेडिकल सुरु करण्यासाठी केले अपहरण (kidnapped for opening medical)
वाकड पोलिसांनी अपहरण प्रकरणात अटक (arrested for kidnapping) केलेला आरोपी कमलेश बाफना याला मेडिकल दुकान सुरु करायचे होते.
बाफना याच्या सांगण्यावरुन आरोपींनी फिर्यादी यांचे अपहरण केले.
बाफना याला फिर्यादी यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढून त्याला मेडिकल सुरु करायचे होते.
त्यासाठी त्याने अपहरणाचा कट रचला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad Police Commissioner Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 आनंद बोईटे (Deputy Commissioner of Police Unit-2 Anand Boite, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले (Assistant Commissioner of Police Shrikant Disley), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Vivek Mugalikar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे 1 संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे 2 सुनिल टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. पाटील, अभिजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस अंमलदार विजय वेळापुरे, दिपक भोसले, बापुसाहेब धुमाळ, राजु काळे, वंदु गिरी, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, प्रमोद कदम, दिपक साबळे, सुरज सुतार, तात्या शिंदे, कौतेय खराडे यांच्या पथकाने केली.

Wab Title : Extortion Case Medical professional kidnapped for ransom gang of 7 arrested

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना