बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारी महिला गजाआड 

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे .लाखनवाली गावात रहाणाऱ्या महिलेला ग्रेटर नोएडा येथून अटक केली असून हि कार्यवाही सूरजपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले होते तसेच त्यांच्यातील मॅसेज फोनकॉल पोलिसांनी तपासले असता आरोपी फिर्यादी इसमास बॅकमेल करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. आरोपी महिला फिर्यादीस फोनवरून १० लाख रुपये देण्याची मागणी करत होती तसेच १० लाख रुपये जर तू मला दिले नाहीस तर तुझ्या विरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार देईल अशी धमकी ती देत होती. तिच्या मागणीला कंटाळून फिर्यादीने ११ ऑक्टोबर रोजी त्या महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. परंतु ती महिला तक्रार दाखल केल्या नंतर फरार झाली त्यांनतर ती महिला आज पोलिसांच्या हाती लागली आहे.

पोलिसांनी त्या महिलेचे नाव उघड केले नसून फिर्यादीचे नाव हि गुप्त ठेवले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महिलेला न्यायालयात हजरन केले असता त्या महिलेवर भारतीय दंड संहितेचे कलम ३८८आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या महिलेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. भारतीय दंड संहितेचे कलम  ३८८ हे खंडणीच्या जबरी गुन्ह्यासाठी लावण्यात येते. तसेच खटला जर संवेदनशील असेल तर त्यातील आरोपीचा जमीन अर्ज फेटाळण्याचा कोर्टाला पूर्ण अधिकार असतो.

भाजपचा युवा नेता असल्याचे भासवत केली खंडणीची मागणी 
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लेखराजसिंह निहालसिंह या ठेकेदारला खानावळीच्या कंचराटात  ५० % भागीदारी देण्याच्या मागणी वरून खंडणी मागणाऱ्या प्रशांत देवीदास पंडित याला पोलिसांनी अटक केली आहे.  लेखराजसिंह निहालसिंह  याने सिडको पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हि कार्यवाही केली आहे. लेखराजसिंह निहालसिंह हा  इंडो जर्मन टूल्स रूम कंपनीची खानावळ  चालवतो या कंपनीच्या खानावळीच्या  कंचराटात  ५० % भागीदारी देण्याची मागणी प्रशांत देवीदास पंडित याने केली. हि मागणी  लेखराजसिंह निहालसिंह पूर्ण नकेल्याने  त्याच्या विरोधात प्रशांतने कंपनीकडे तक्रार केली. त्याने तक्रार मागे घ्यायला लेखराजसिंह यांच्याकडे ५० हजारांची मागणी केली आणि त्यानंतर  तो दहा हजार घेण्यास तयार झाला. अर्थात या मागे पोलिसांनी सापळा लावला होता. सापळा लावल्याने पोलिसांनी प्रशांत देवीदास पंडित यास रंगे हात १० हजार रुपयांची खंडणी घेताना अटक केली आहे. या तपासात पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भारत पाचोळे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.