औरंगाबाद विद्यापीठात PHD चा धक्कादायक प्रकार उघड ! विद्यार्थ्याना लुटणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पिडीच.डी चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांस अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास 40 हजार रुपये देण्याचा सल्ला दिला आहे. याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी विभागात कसा भ्रष्टाचार चालत आहे. हे ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर उघडकीस आले आहे.

राहणे, जेवणासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये मागण्यात आले. त्याशिवाय परीक्षाच घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून 8 हजार रुपयांवर विनाअनुदानित महाविद्यालयात अध्यापन करतो. राज्यशास्त्र विभागातील या विद्यार्थ्यासाठी परभणी जिल्ह्यातील बहिस्थ परीक्षकाची वेळ तीन वेळा घेण्यात आली. मात्र, पैसे मिळाले नसल्याने तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आली. यावर अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतर यांनी बोलण्यास नकार देत हा विषय राजकीय झाला असल्याचे सांगितले.

चहाची टपरी टाकावी वाटते
बाबासाहेब नावाने असलेल्या विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात शिक्षण, एम.फिल आणि पीएच.डी चे संशोधन केले. हे क्षेत्र सोडून चहाची टपरी टाकावी. पुन्हा याकडे येऊ नये, असे वाटत असल्याचे संशोधक विद्यार्थ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले.