अनैतिक संबंधाला मुलानं केला विरोध, बापानं संपवलं !

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – शेजारच्या महिलेशी असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या मुलाचा खून करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दीड वर्षानंतर या खुनाचा तपास लागला आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण राहुल जाधव याचा पिता म्हणजेच आरोपी अशोक जाधव यानेच मुलाचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपी बापाला अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
आरोपी अशोक जाधव याचे घरासमोरील महिलेशी अनैतिक संबंध होते, मात्र मुलगा राहुल याचा याला विरोध होता. त्यानंतर 25 एप्रिल 2018 रोजी राहुल घरात मृत आढळून आला होता. त्यावेळी त्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले गेले. मात्र हि आत्महत्या नसून त्याच्या वडिलांनी त्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जुनी प्रकरणे चाळत असताना त्यांच्या निदर्शनास राहुलची फाईल आली. मात्र यामध्ये शवविच्छेदनाचा अहवाल नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी ताबडतोब या प्रकरणाचा तपास करत हि आत्महत्या नसून खून असल्याचे उघड केले. त्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी त्याने घरच्यांना देखील धमकी दिली होती. त्यामुळे कुणीही त्याच्याविरुद्ध तोंड उघडले नाही. मात्र पोलिसांनी त्याला अटक करताच घरच्यांनी त्यांच्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून दिल्या.

Visit : Policenama.com