अनैतिक संबंधाला अडथळा ठरणार्‍या सासूचा ‘चोखंदळ’ सुनेने काढला ‘काटा’, प्रियकराची मदत घेवून खून

शाहडोल (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – प्रियकरासोबत अनैतिक संबंध ठेवताना सासूचा अडथळा येत असल्याने सुनेच्या प्रियकरानेच कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला. खून करून मृतदेह शेतातील एका झाडाखाली फेकून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. विशेष म्हणजे आरोपी हा गावचा उपसरपंच आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील शाहडोल येथे ८ जुलै रोजी घडला.

गंगाधर बैगा असे अटक करण्यात आलेल्या उपसरपंचाचे नाव आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने गावच्या संरपंचाच्या पतीला तुमच्या शेतात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती दिली. सरपंचाच्या पतीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता गंगाधर बैगा हा घटनेच्या दिवशी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन जाताना दिसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याचे आणि मयत ललिया सिंह कंवर या महिलेच्या सुनेचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी गंगाधरला ताब्यात घेऊन त्याच्या चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत ललिया ही तिच्या सुनेसोबत वारंवार भांडण करत होती. तसेच ती आमच्या अनैतिक संबंधाला अडथळा येत होती. त्यामुळे तिच्यावर कुऱ्हाडीने वार करून मृतदेह शेतात फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like