मोठा दावा : पृथ्वीच्या जवळ आपल्या सौर मंडळात ‘या’ ग्रहावर मिळाले ‘जैव’ संकेत

नवी दिल्ली : पृथ्वीच्या जवळ आणि आपल्या सौर मंडळात एक असा ग्रह सुद्धा आहे जेथे जैव शक्यता दिसून येत आहे. तेही त्या ग्रहांच्या ढगांमध्ये. हैराण करणारी बाब ही आहे की, हा ग्रह तुम्ही उघड्या डोळ्यांनी रात्रीच्या वेळी पाहू शकता. एवढेच नव्हे, तर या ग्रहावर 37 सक्रिय ज्वालामुखी सुद्धा आहेत जे दिवसरात्र फुटत आहेत. यामुळे या ग्रहांच्या ढगांमध्ये जैव अंश शोधणे एक मोठे यश समजले जात आहे.

या ग्रहाचे नाव आहे शुक्र. या ग्रहाच्या दाट ढगांमध्ये शास्त्रज्ञांना जैव अंश आढळले आहेत. शास्त्रज्ञांनी या ढगांमध्ये एक असा गैस शोधला आहे, जो पृथ्वीवर जीव उत्पत्तीशी संबंधित आहे. या गॅसचे नाव आहे फॉस्फीन. मात्र, शुक्र ग्रहाच्या वातावरणात कोणतेही जीवन असणे जवळपास अशक्य आहे, असे असताना फॉस्फीन गॅस सापडणे एक आश्चर्यकारक घटना आहे.

मॅसाच्यूसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) च्या अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिस्ट म्हणजे अंतराळ जीव शास्त्रज्ञ सारा सीगर यांनी सांगितले की, आमच्या या शोधाचा रिपोर्ट नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झाला आहे. आम्ही त्यामध्ये लिहिले आहे की, शुक्र ग्रहाच्या वातावरणामध्ये पृथ्वीपेक्षा वेगळ्या जीवनाची शक्यता आहे. आम्ही हा दावा करत नाही की, या ग्रहावर जीवन आहे. परंतु शक्यता असू शकते, कारण तेथे एक खास गॅस मिळाला आहे जो जीवांमधून उत्सर्जित होतो.

फॉस्फीन गॅसचे कण पिरामिडच्या आकाराचे असतात. यामध्ये फॉस्फोरसचा एक कण आणि वर-खाली तीन हायड्रोजनचे कण असतात. परंतु हैराण करणारी बाब ही आहे की, या दगड-धोंड्यांच्या ग्रहावर हा गॅस कसा तयार झाला. कारण फॉस्फोरस आणि हायड्रोजन एकत्र येण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाब आणि तापमान आवश्यक असते. ढगांचे ही छायाचित्रे युरोपियन साऊथर्न लॅबोरेटरी आणि अलमा टेलीस्कोपने घेतली गेली आहेत.

शुक्र ग्रहावर 37 ज्वालामुखी सक्रिय आहेत. त्यांचा नुकताच स्फोटसुद्धा झाला आहे. यापैकी काही थोड्या-थोड्या अंतराने अजूनही फुटत आहेत. हा ग्रह भौगोलिकदृष्ट्या खुप अस्थिर आहे. तो जास्त काळ शांत राहू शकत नाही. यामध्ये सतत काही ना काही हालचाली होत असतात. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडच्या शास्त्रज्ञांनी या ज्वालामुखीचा शोध लावला होता.

शुक्र ग्रहावर नुकतकाच एका ज्वालामुखीचा स्फोट झाल्याने पृष्ठभागावर कोरोने किंवा कोरोना सारखी संरचना तयार झाली. कोरोना सारखी संरचना म्हणजे गोली खड्डे जे खुप खोल असतात. ज्वालामुखी लव्हा वाहण्यासाठी कोणत्याही ग्रहावर कोरोना खड्डे असणे आवश्यक असते. येथील 37 ज्वालामुखी जास्त करून शुक्र ग्रहाच्या दक्षिण गोलार्धात आहेत. यापैकी मोठा कोरोना ज्यास अर्टेमिस म्हणतात, तो 2100 किलोमीटर व्यासाचा आहे.