‘क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम’ची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, दिवसभर जाणवतो थकवा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या-छोट्या शारीरीक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याची अनेकांन सवय असते. परंतु, ही दुर्लक्ष करण्याची सवय काहीवेळा घातक ठरू शकते. थकवा जाणवणे ही तशी सर्वसामान्य समस्या आहे. परंतु, सतत थकवा जाणवत असेल, छोटे काम केले तरी थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. हे लक्षण क्रॉनिक फॅटीग सिंड्रोमचे असू शकते. या आजारात अनेक दिवस थकवा जाणवतो. आराम केला तरी सुद्धा थकवा दूर होत नाही. तपासण्या सुद्धा नॉर्मल येतात. 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस थकवा जाणवत असल्यास क्रॉनिक फॅटीग सिंड्रोम असल्याचे सांगितले जाते. या आजाराची लक्षणे आणि कारणे जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणे
1. सतत सांधेदुखीचा त्रास.
2. झोप न येणे. झोपल्यानंतरही आळस.
3. स्मरणशक्तीची समस्या.
4. सतत घसा खराब होणे.
5. थोडी शारीरिक मेहनत केली अधिक काळ आजारी असल्यासारखे वाटणे.
6. थकवा आल्यामुळे डोकेदुखीचा त्रास.
7. स्नायूंमध्ये सतत वेदना.

ही आहेत कारणे
1. व्हायरल इन्फेक्शन
2. इम्यून सिस्टम कमजोर होणे
3. हार्मोन्सचे असंतुलन