वजन कमी करण्यासाठी ‘लो-कार्ब’ डाएट घेताय ? एकदा ‘हे’ वाचा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   फिट राहयला सर्वांनाच आवडतं. सर्वांनाच वाटतं की, आपलं वजन हे नियंत्रणात राहायला हवं. आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण लो कार्ब्स डाएट फॉलो करतात. परंतु याबद्दल अनेकांना खोल माहिती नसते. तुम्हाला माहिती आहे का लो कार्ब्स डाएटमुळं लवकर वय वाढतं आणि मृत्यूचा धोकाही वाढतो. निश्चितच ही बाब अनेकांना माहित नसेल. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

काय सांगतो रिसर्च ?

जपानमधील विद्यापीठातील प्राध्यापकांचं मत आहे की, ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी आणि आतड्यांची चरबी घटवण्यासाठी लो कार्ब डाएटचा फायदा मिळतो. परंतु हा डाएट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाणं गरजेचं आहे.

लो कार्ब डाएटचं नुकसान आणि तोटे

वजन कमी करण्यासाठी तसा तर याचा फायदा होतो. परंतु सतत जर तुम्ही हा डाएट घेत असाल तर यामुळं शरीरावर वाईट प्रभाव पडतो. जाणून घेऊयात यामुळं होणाऱ्या समस्या आणि नुकसान.

1) लिव्हरसंबधित समस्या – जास्त काळ जर लो कार्ब डाएट घेतला तर लिव्हरसंबंधित समस्या उद्भवण्याचा धोका असतो. कार्बच्या कमतरतेमुळं लिव्हर हा फॅट आणि प्रोटीनयुक्त ग्लुकोज बनवू लागतो. यामुळं शरीरात अमोनियाचं प्रमाण वाढतं.

2) व्हिटॅमिन आणि पोषक तत्वांची कमतरता – जेव्हा गरजेपेक्षाही जास्त कमी प्रमाणात कार्ब्स घेतले जातात तेव्हा शरीराला आवश्यक ते पोषकतत्व मिळत नाहीत. यामुळं शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅनिम डीची कमतरता जाणवते. याशिवाय कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचीही कमतरता जाणवते.

3) स्नायू होतात कमकुवत – लो कार्ब्समुळं इलेक्ट्रोलाईटचं प्रमाण कमी होतं. यामुळं स्नायू कमकुवत होऊ लागतात. असं झाल्यास अंगदुखी, जॉईंटमध्ये समस्या जाणवू लागते.

4) मेंदूवरही पडतो प्रभाव – मेंदूच्या सुरळीत कार्यासाठी ग्लुकोजची गरज असते. शरीरातील 50 टक्के ग्लुकोज हे मेदूद्वारे वापरलं जातं. कार्बोहायड्रेटद्वारेच शरीरात ग्लुकोज वाढतं. परंतु लो कार्ब्समुळं मेंदूला हे ग्लुकोजही कमी मिळतं. साधारणपणे एका हेल्दी व्यक्तीला रोज 130 ग्रॅम कार्बोहायड्रेटची गरज असते.

हेल्दी कार्बोहायड्रेटसाठी काय खावं ?

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि यासाठी तुम्ही जर लो कार्ब्स डाएट घेत असाल तर तुम्ही आहारात हेल्दी कार्ब्सही खावू शकता. यासाठी तुम्ही ब्राऊन राईस, गव्हाचे पदार्थ, ज्वारी, बाजरी, डाळी असे पदार्थ खाऊ शकता. यात हेल्दी कार्ब्स असतात.