Eye Care | ‘या’ तीन गोष्टींमुळे डोळ्यांच होतं गंभीर नुकसान; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डोळे ही ईश्वराची देणगी मानली जाते, कारण त्यामुळे आपल्याला बाह्यजगाचे दर्शन घडते. ते शरीरातील अत्यंत नाजूक अवयवांपैकी एक आहेत (Eye Care Tips), त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे (Eye Care). प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून डोळ्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. यात आपल्या आहाराची विशेष भूमिका असते. दररोज आपण अशा अनेक गोष्टी जाणूनबुजून किंवा नकळत सेवन करत राहतो जे डोळ्यांना खूप हानिकारक ठरू शकतात (Healthy Eye). बर्‍याच गोष्टींचे दीर्घकाळ सेवन केल्याने दृष्टी कमकुवत होऊ शकते (Eye Care).

 

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांना देखील योग्य पोषणाची आवश्यकता असते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी अ, ई, सी या जीवनसत्त्वांसह ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड (Vitamins A, E, C, Omega-3 Fatty Acid) असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी डोळ्यांना अपायकारक मानल्या जातात? या गोष्टींपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो (Eye Care).

 

जंक फूड हानिकारक (Junk Food Harmful) –
असतात जंक फूड्समुळे केवळ शरीराचे वजन वाढत नाही तर त्यांचे अतिसेवन देखील आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक मानले जाते. चिप्स, कुकीज आणि कँडीजसारख्या जास्त स्नॅक पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्य बिघडते. या गोष्टींमध्ये अस्वास्थ्यकर चरबी व्यतिरिक्त, मीठ आणि साखरेच्या अतिरिक्ततेमुळे शरीराच्या अवयवांवर आणि रक्ताभिसरण प्रणालीवर परिणाम होतो, ज्यामुळे डोळ्यांना रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह खंडित होतो. म्हणून जंक फूड खाणे टाळावे.

गोड पेयांमुळे आरोग्याला हानी (Sweet Drinks Harmful To Health) –
सोडा आणि कोल्ड्रिंक्सला उन्हाळ्याच्या दिवसात लोकांची पहिली पसंती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांचे सेवन शरीरासाठी खूप हानिकारक असते?

 

संशोधनात असे आढळले आहे की कोल्ड्रिंक्समध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. संशोधकांना असे आढळले आहे की या प्रकारचे स्वीटनर वापरणारी पेये ट्रायग्लिसेराइडची पातळी वाढवता. त्यामुळे उच्च रक्तदाब समस्या उद्भवू शकते. या अवस्थेमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

 

तळलेल्या वस्तू हानिकारक (Fried Food Harmful) –
पकोडे, समोसे इ. सारख्या तळलेल्या वस्तू जर तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यांचे सेवन कमी करा. हे आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक असू शकते. तळलेल्या गोष्टींमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण (Monounsaturated And Polyunsaturated Fat Level) जास्त असते. ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोकाही वाढतो. डोळे निरोगी ठेवण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन टाळा.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी काय खावे (What To Eat To Keep Eyes Healthy) ? –
दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात शक्य तितक्या निरोगी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करा.
अंडी, हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळं आणि बेरी, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सयुक्त पदार्थ, मासे, बदाम इत्यादी
पदार्थांचं सेवन करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. रोजच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Eye Care | what foods and drinks affect eyes health know what not to eat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

 

 Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे

 

Methods For Removing Wrinkles | वाढत्या वयाबरोबर हातावर सुरकुत्या पडत आहेत, ‘या’ घरगुती उपायांचा अवलंब करा; जाणून घ्या