महापालिकेच्या नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीने पुणे महापालिका व बी. जे. मेडिकल कॉलेज (ससून सर्वोपचार रुग्णालय) यांच्या वतीने महापालिकेच्या नऊ दवाखान्यांमध्ये नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पुणे महापालिकेच्या सहा दवाखान्यांमध्ये नेत्रतपासणी करण्यात येते. याशिवाय कमला नेहरू रुग्णालय-मंगळवार पेठ, मुकुंदराव लेले दवाखाना-शनिवार पेठ या दवाखान्यांमध्ये दोन ठिकाणी डोळ्यांची तपासणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना नेत्रसेवेचा लाभ मिळण्यासाठी पुणे महापालिकेच्या नऊ दवाखान्यांमध्ये पुढील पाच वर्षांकरीता बी. जे. मेडिकल कॉलेज, ससून सर्वोपचार रुग्णालय येथील नेत्रतज्ज्ञांमार्फत रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांची ससून सर्वापचार रुग्णालय येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f47bb75-c16f-11e8-95b4-cd652c60ee63′]

याबाबत पुणे महापालिका व बी. जे. मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’662ea138-c170-11e8-8714-25d2b5211522′]
ब्लॅकमेल करुन ‘प्रायव्हेट डिटेक्टिव्ह’चा खून

[amazon_link asins=’B0741G9HVS,B07BHFT3VQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b6b535a-c170-11e8-afdd-35dd321d6116′]
पदोन्नतीमध्ये SC-ST कर्मचाऱ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारचाच