डोळ्यांचे विकार कोणते ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

डोळ्यांचे विकार म्हणजे काय ?

डोळ्यांच्या विविध भागांच्या समस्या उद्भवणं म्हणजेच डोळ्यांचे विकार आहेत. डोळे कोरडे होणं, कंजक्टीव्हायटीस, ग्लोकोमा, मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटीक रेटीनोपॅथी, मोतीबिंदू, दृष्टी अधू होणं, चकणेपणा, लेझी आय आणि दृष्टी जाणं अशा डोळ्यांच्या साधारण समस्या आहेत.

काय आहेत याची लक्षणं ?

– डोळे लाल होणं आणि सुजणं
– डोळ्याला खाज आणि डोळ्यात चिपडे जमा होणं
– डोळे चुरचुरणे आणि जड वाटणं
– दृष्टी अधू होणं
– डोळ्यांभोवती आणि डोळ्यात वेदना होणं
– धुरकट, अस्पष्ट किंवा दुहेरी दुहेरी दृश्य दिसणं
– दष्टीसमोर डाग कंवा ठिपके दिसणं. उदा फ्लोटर्स
– बुबुळांचा रंग बदलणं
– प्रकाशामुळं डोळे दीपणं
– दृष्टी जाणं
– डोळ्यांवर पडदा असल्यासारखं वाटणं

काय आहेत याची कारणं ?

– जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवींमुळं होणारा संसर्ग.
– मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोग परिस्थितीत संधीवात, जोग्रेन सिंड्रोम सारख्या आटोइम्युन कंडिशन्स
– डोळ्यांवर खूप ताप येणं
– व्हिटॅमिन ए ची कमतरता
– अनुवांशिक रोग
– अ‍ॅलर्जी
– लांबलेले औषधोपचार
– वृद्धत्व

काय आहेत यावरील उपचार ?

– वर्षातून एकदा किंवा नियमित डोळ्यांची तपासणी
– व्हिज्युअल फिल्ड टेस्टींग
– चष्मा, कॉन्टॅक्ट लेंस किंवा लेझर उपचारांनी दृष्टी दुरुस्त करणं
– डोळे कोरडे झाल्यास ओलावा देण्यासाठी औषध किंवा आय ड्रॉप्स किंवा आय जेल्स
– डायबेटीक रेटीनोपॅथीसाठी लेझर उपचार
– मोतीबिंदू आणि रेटीनल डिटॅचमेंटवरील उपचार म्हणून सर्जिकल इंटरव्हेंशन
– मॅक्युलर डिजरेशनवरील उपचार म्हणून फोटोडायनॅमिक थेरपी
– डोळ्यांच्या कोरडेपणावर ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स आणि पौष्टीक सप्लीमेंट्स

दैनंदिन जीवनात काय काळजी घ्यायला हवी ?

– व्हिटॅमनयुक्त आहार
– धूम्रपान करणं टाळावं
– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी
– सनग्लासेस वापरणं
– डोळ्यांना पुरेसा आराम देणं

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.