Eye Twitching : अशुभ नाही डोळा फडफडणे, जाणून घ्या खरे कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डोळा किंवा पापणी फडफडण्याचा संबंध नेहमी अंधश्रद्धेशी जोडला जातो. बहुतांश लोक यास अशुभ मानतात, परंतु प्रत्यक्षात असे असेत का? खरंतर डोळ्याचे फडकणे आरोग्याशी संबंधीत आहे. शरीरातील कोणत्याही भागात मांसपेशी फडकणे सामान्य बाब आहे. जेव्हा मांसपेशींमध्ये अकुंचन होते तेव्हा ती फडकू लागते.

आपल्या मांसपेशी त्या फायबर्सपासून बनलेल्या असतात ज्यांना नसा नियंत्रित करतात. नसांचे नुकसान झाल्यास मांसपेशी फडकू लागतात. बहुतांश प्रकरणात मांसपेशी फडकणे चिंतेचे कारण नसते. परंतु, कधी-कधी हे गंभीर सुद्धा असू शकते आणि अशा स्थितीत तुम्हाला डॉक्टरांकडे गेले पाहिजे.

डोळा का फडफडतो
डोळ्याच्या मांसपेशी जेव्हा आखडतात तेव्हा त्या फडकू लागतात. हा ताण वरच्या किंवा खालच्या दोन्ही पापण्यांमध्ये होऊ शकतो. काही लोकांमध्ये हे खुप सामान्य आहे. परंतु काही लोकांची पापणी इतक्या जोरात फडकू लागते की, त्यांना दिसत नाही. अशा स्थितीला ब्लेफेरोस्पाज्म म्हणतात.

डोळ्यांचे फडकणे काही सेकंदापासून एका किंवा दोन मिनिटांपर्यंत राहू शकते. हे अनेक दिवसांपर्यंत सुद्धा राहू शकते. डोळ्याच्या फडफण्यात कोणतीही वेदना होत नाही आणि हे आपोआपच बरे होते. परंतु काही प्रकरणात हा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत सुद्धा असू शकतो.

का फडफडतो डोळा
कधी-कधी डोळा विनाकारण सुद्धा फडकतो. परंतु कधीकधी याची अनेक कारणे असू शकतात. जसे की, डोळ्यात खाज होणे, डोळ्यावर दबाव येणे, थकवा, झोप पूर्ण न होणे, शारीरीक दबाव, तणाव, एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट, तंबाखू, कॅफीन किंवा दारूचे जास्त सेवन. डोळे कोरडे होणे, पापण्यांमध्ये सूज आणि कंजक्टीवायटिस झाल्यास डोळ्यांचे फडकणे जास्त त्रास देते.

असा करा उपचार
* सामान्यपणे डोळ्यांचे फडकणे आपोआप बरे होते.
* जर आपोआप ठिक झाले नाही तर लाइफस्टाइलमध्ये काही बदल करा.
* कॅफीनचे सेवन कमी करा.
* पूर्ण झोप घ्या.
* किंचित गरम फडक्याणे शेकवू शकता.
* तणाव बाळगू नका.
* सिगारेट, दारू आणि तंबाखूचे सेवन करू नका.
* गंभीर प्रकरणात ताबडतोब डॉक्टरांकडे जा.