डोळ्यात संसर्ग होतो म्हणजे नेमकं काय होतं ? याचे प्रकार किती ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ !

काय आहे डोळ्यातील संसर्ग ?

डोळ्यातील संसर्ग साधारणपणे सगळीकडे आढळून येतो. जीवाणू, विषाणू बुरशी अशा अनेक कारणांमुळं डोळ्यांना संसर्ग होतो. यामुळं डोळे लाल होणं, सुजणं, डोळ्याला खाज येणं, चिपाड जमा होणं आणि डोळे दुखणं असे त्रास होतात. सर्वात जास्त आढळून येणारा डोळ्यांचा संसर्ग म्हणजे कंजंक्टीव्हायटीस आहे जो विषाणूजन्य आहे.

काय आहेत याची लक्षणं ?

विविध संसर्गाची विविध कारणं आहेत ती पुढीलप्रमाणे –

1) कंजंक्टीव्हायटीस आणि ब्लेफारिटीस :

– सुजलेले डोळे
– वेदना
– सूज
– डोळ्यातून पाण्यासारखा स्त्राव बाहेर पडणे

2) जीवाणूजन्य केराटीटीस

– वेदना
– लालसरपणा
– स्त्राव
– फोटोफोबिया
– डोळ्यातून पाणी येणं
– दृष्टी कमी किंवा धूसर होणं
– कॉर्नियल अल्सर

3) हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस केराटीटीस :

– वेदना
– दृष्टी कमी किंवा धूसर होणं
– डोळ्यातून पाणी येणं
– स्त्राव
– अल्सर
– खाजवणं
– फोटोफोबिया

4) एंडोफ्थल्मिटीस :

– वेदना
– लालसरपणा
– दृष्टी अधू होणं

5) स्टाय :

– वेदना
– गुठळी बनणं ज्यात पस होण्याची शक्यता असते
– डोळे लाल होणं आणि त्यातून पाणी येणं

काय आहेत याची कारणं ?

प्रत्येक संसर्गाची कारणं ही वेगवेगळी आहेत ती पुढीलप्रमाणे –

1) कंजंक्टीव्हायटीस – कंजंक्टीव्हायटीसनं संसर्गित असलेल्या व्यक्तीच्या अप्रत्यक्ष संपर्कात आल्यानं याचा प्रसार होतो.

2) जीवाणूजन्य केराटीटीस – कॉन्टॅक्ट लेंसच्या वापरामुळं किंवा डोळ्यावर होणाऱ्या आघातामुळं हा होतो.

3) हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस केराटीटीस – हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरसमुळं होतो.

4) एंडोफ्थल्मिटीस – मायक्रोबियल संसर्गामुळं डोळ्याला सुज येते किंवा दाह होतो. डोळ्यांची शस्त्रक्रिया, डोळ्यांवर होणारा आघात किंवा एखादा अपघात आणि डोळ्यात गेलेल्या इंजेक्शनमुळं देखील हा संसर्ग होतो.

काय आहेत यावरील उपचार ?

संसर्गाची तीव्रता, लक्षणं आणि प्रकार यावर याचे उपचार अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे आढळून येणाऱ्या डोळ्यांच्या संसर्गावरील उपचार हे पुढीलप्रमाणे आहेत.

– व्हायरल कंजंक्टीव्हायटीस असेल तर डॉक्टर तुम्हाला अॅंटीव्हायरल ड्रॉप्स किंवा जेल्स सुचवू शकतात.
– जीवाणूजन्य केराटीटीसवर साधारणपणे क्लोरमफेनिकॉल सुचवण्यात येते.
– हर्पीस सिम्प्लेक्स केराटीटीससाठी तोंडावाटे घेण्यात येणारे अँटी व्हायरल एजंट्स आणि टॉपिकल स्टेरॉईड्स दिले जातात.
– एंडोफ्थल्मिटीसवर व्हिट्रीयल इंजक्शन्स किंवा शिरेतून इंजेक्शन द्यायची गरज भासू शकते. तसेच तोंडावाटे घेण्यात येणारी अँटीबायोटीक्सही दिली जातात.
– पॅरासिटामोल किंवा इतर वेदनाशामकांनी स्टायमध्ये लक्षणीय आराम मिळू शकतो. गरम कापडानं डोळा शेकला तर सूज कमी होण्यास मदत होते.
– तुम्हाला झालेला संसर्ग बरा होई पर्यंत कॉनटॅक्स लेंसेस न वापरण्याचा सल्ला नेत्रविकार तज्ज्ञ तुम्हाला देतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.