होय, Face App मुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलगा सापडला

शेन्झेन (चिन) : वृत्तसंस्था – म्हातारपणात आपण कसे दिसू हे पाहण्याच्या उत्सुकतेनं सध्या सोशल मीडियावर Face App या मोबाइल अ‍ॅपचा वापर केला जात आहे. पण या फोटोंच्या नावाखाली हे अ‍ॅप लोकांची खासगी माहिती गोळा करत आहे, असा आरोप होत असताना याच अ‍ॅपमुळे १८ वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलाचा शोध लागला आहे. Face App मुळे चिनी अधिकाऱ्यांना या मुलाचा शोध घेण्यात यश आले आहे.

यु वीफेंग नावाच्या मुलाचे २००१ मध्ये अपहरण झाले होते. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर पोलिसांनी या केसची फाईल बंद केली. मात्र, पोलिसांनी याचा पुन्हा शोध सुरु केला. अपहरण झाले त्यावेळी मुलाचे वय फक्त ३ वर्ष होते. त्यामुले २१ वर्षाच्या मुलाचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान पोलिसांनी Face App वर मुलाचा लहानपणाचा फोटोला अडल्ट फोटोमध्ये बदलले.

पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजंन्स सॉफ्टवेयरची मदत घेतली. यानंतर, मुलाचे बदलेले चित्र १०० लोकांच्या चेहऱ्यासोबत जुळवून पाहिले. अखेर पोलिसांना वीफेंगचा शोध लागला. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता तो गुआंगझौ येथे शिकत असल्याची माहिती मिळाली. सुरवातीला त्याने आपले अपहरण झाले असल्याचा दावा फेटाळून लावला. अखेर पोलिसांनी त्याचे डिएनए चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानुसार तो सध्या रहात असलेल्या दांपत्याचा मुलगा नसल्याचे सिद्ध झाले. सध्या वीफेंग त्याला दत्तक घेतेल्या पालकांसोबतच रहात आहे.

आरोग्यविषय वृत्त –

You might also like