मिनिटांची ‘मजा’ आणि आयुष्यभराची ‘सजा’ ! दिवे लावण्याऐवजी हुल्लडबाजी करीत तोंडातून आगीचे गोळे काढले, अद्दल घडली

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचे आवाहन केले होते. त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, काही ठिकाणी अतिउत्साही तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आल्याचे दिसून आले. संबंधित तरुणांनी दिवे लावण्याऐवजी तोंडातून आगीचे गोळे काढल्याची घटना घडली आहे.

पंतप्रधानांनी देशवासियांना एकतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी केलेल्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यावेळी थाळी वाजतवाना करण्यात आलेली त्याप्रमाणे काहीजण हुल्लडबाजी करताना दिसून आले. उज्जैन येथे एका तरुणाने दिवे लावण्याऐवजी तोंडात रॉकेल भरुन आगीचे गोळे काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याला आयुष्यभरासाठीची अद्दल घडली आहे. त्याची ही कलाबाजी पाहण्यासाठी काही लोकही तिथे उपस्थित होते.

https://twitter.com/socialbhopal/status/1246884134783348736

मात्र यावेळी त्याच्या चेहर्‍याला आग लागली. त्याच्या सुदैवाने आजूबाजूला काही तरुण उपस्थित होते. ज्यांनी लगेच धाव घेतली आणि त्याच्या चेहर्‍यावरील आग विझवली. पण यामुळे तरुणाला आयुष्यभरासाठीची अद्दल घडली आहे. तरुणाचा चेहरा गंभीर भाजला आहे. दरम्यान घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवारी रात्री एकीकडे लोक घराच्या गॅलरी, खिडकीत दिवा लावून मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत होते. काहीजण मात्र रस्त्यावर उतरले होते.