चेहरा धुताना तुम्ही देखील करता का ‘या’ चुका ? जाणून घ्या योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना वारंवार चेहरा धुण्याची सवय असते. परंतु यामुळं चेहऱ्याला हानी पोचू शकते. चेहरा स्वच्छा असणं गरजेचं आहे. परंतु वारंवार धुवायला हवा असं अजिबात नाही. चेहऱ्याची स्वच्छता महत्त्वाची आहेच. परंतु अनेकजण चेहरा चुकीच्या पद्धतीनं धुवत असतात. आज आपण यासाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत.

किती वेळा धुवावा चेहरा ?

चेहरा सकाळी आणि संध्याकाळी असा दोन वेळा धुवावा. जर तुम्ही काही कामानिमित्त बाहेर जात असाल तर अशावेळी जाण्याआधी आणि जाऊन आल्यानंतर असा दोन वेळाही धुवू शकता. म्हणजे तुम्ही एकूण 4 वेळा जास्तीत जास्त चेहरा धुवू शकता. परंतु यापेक्षा जास्त नाही.

कशानं धुवावा चेहरा ?

चेहरा धुताना ,साबणाचा वापर करणं टाळायला हवं. क्लिन्जर किंवा फेसवॉशचा वापर करावा. जर त्वचा नॉर्मल टू ड्राय असेल तर हायड्रेटींग आणि क्रिमी क्लिन्जर वापरावा. जर त्वचा संवेदनशील असेल तर जेंटल क्लिंजर वापरा. त्वचा ऑईली असेल तर फेसवॉश वापरा. जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही फोमिंग किंवा जेल क्लिंजर वापरू शकता.

कसा वापराल क्लिंजर ?

याची देखील एक पद्धत असते. तुम्ही क्लिंजिंग लोशन वापरत असाल तर मॉईश्चराईजरप्रमाणे ड्राय स्कीनवर काही मिनिटे चोळा. जेल किंवा फोम वापरत असाल तर सुरुवातीला चेहरा ओला करा आणि मग वापरा. अॅक्नेसाठी क्लिंजर वापरत असाल तर काही वेळ चेहऱ्यावर असू द्या. नंतर चेहरा धुवून घ्या.

चेहरा धुण्यासाठी कोणतं पाणी वापरावं ?

चेहरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळं चेहऱ्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. चेहरा लालसर आणि कोरडा होतो. त्यामुळं कोमट पाण्यानं चेहरा धुवावा.

टॉवेलचा वापर चेहऱ्यावर कसा करावा ?

चेहरा धुतल्यानंतर अनेकजण जोर देऊन घासून टॉवेल चेहऱ्यावरून फिरवतात. यामुळं इरिटेशन आणि रेडनेसची समस्या येईल. टॉवेलनं फक्त चेहऱ्यावर टॅप करा. यामुळं फक्त पाणी शोषलं जाईल.

चेहऱ्यासाठी कोणता टॉवेल वापरावा ?

चेहऱ्यासाठी बेबी टॉवेल वापरला तर जास्त फायदा होतो. कारण यामुळं त्वचेला हानी पोचत नाही. याशिवाय जर तुम्ही इतर कोणता टॉवेल वापरत असाल तर तो स्वच्छ असायला हवा. त्यावर बॅक्टेरिया नसावेत.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.