धक्कादायक ! मॅकडोनाल्डमधून मागवलेल्या चिकनमध्ये चक्क ‘फेस मास्क’

पोलिसनामा ऑनलाईन – इंग्लंडमध्ये मॅकडोनाल्डमधून मागवलेल्या चिकन नगेटमध्ये चक्क फेस मास्क सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक लहान मुलगी चिकन नगेट खात असताना तिच्या आईला तो फेस मास्क दिसला आणि आईने अक्षरशः तिच्या घशामध्ये बोट घालून ते चिकेन नगेट बाहेर काढले आहे.

लॉरा आर्बर यांनी मंगळवारी इंग्लंडमधील आल्डरशॉट इथल्या मॅकडोनाल्डच्या शाखेतून चिकन नगेट विकत घेतले. पण, नगेट खात असताना अचानक सहा वर्षांची मुलगी मॅडीच्या घशात काहीतरी अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पटकन तिच्या घशामध्ये बोट घालून ते चिकन नगेट बाहेर काढले. त्यात चक्क निळ्या रंगाचा फेस मास्क होता, असा आरोप लॉरा यांनी केला आहे. या प्रकारानंतर लॉरा यांनी तातडीने मॅकडोनाल्डच्या शाखेत संपर्क साधला, पण त्यावर मॅनेजरने नगेट आपल्या इथे बनत नसून आम्ही फक्त तळून देतो असे सांगितले. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची चौकशी करत आहोत, असे मॅकडोनाल्डच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच मॅकडोनाल्डकडून लॉरा यांची माफीही मागण्यात आली आहे.