फेस मास्कमुळं 45 टक्क्यांपर्यंत कोरोनाचा धोका होऊ शकतो कमी, संशोधनातून झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   संपूर्ण जग सध्या कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देत आहे आणि आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील सरकारने संक्रमण कमी करण्यासाठी अनेक सार्वजनिक उपाययोजना राबवल्या आहेत. भारतही यापासून मागे नाही आणि पुन्हा एकदा कोरोना संसर्गाला वेग आला आहे. हेच कारण आहे की, सरकार लोकांना सतत सार्वजनिक ठिकाणी व वाहनांवर मास्क घालण्याचा आग्रह करत आहे, जेणेकरून संसर्ग थांबवता येईल. आता एका संशोधनातही हे सिद्ध झाले आहे की, मास्क वापरल्याने कोरोना संसर्गाचे प्रमाण 45 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

जर्मनीमधील एका अभ्यासानुसार फेस मास्कचा अनिवार्य वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग जलदगतीने होण्यापासून रोखता येतो. मास्क कोरोना रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे दर्शविले गेले आहे. यामुळेच जर्मनीने फेस मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने केलेल्या संशोधन पेपरात प्रकाशित केलेल्या नवीन शोधपत्रात असे दिसून आले आहे की, कोणत्याही जर्मन प्रदेशात फेस मास्क वापरल्यानंतर 20 दिवसांनंतर त्या प्रदेशात नवीन कोविड-19 संसर्गाच्या घटना 45 टक्केने कमी झाल्या आहेत.

यावरून असा निष्कर्ष काढला गेला आहे की, मास्क कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी माध्यम आहे. जेव्हा इतर सार्वजनिक आरोग्य मापनांपेक्षा याची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते तेव्हा हे विशेषतः महत्त्वाचे होते. अभ्यासामध्ये नमूद केले आहे की, “आम्ही ज्या क्षेत्राचा विचार करतो त्या क्षेत्राच्या आधारे, आम्हाला असे आढळले आहे की, फेस मास्कचा वापर केल्यामुळे त्या भागातील नव्याने संक्रमित रुग्णांना 20 दिवसांच्या कालावधीत 15 ते 75 टक्क्यांदरम्यान परिणाम झाला आहे. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, फेस मास्क “नोंदवलेल्या संक्रमणाच्या दैनंदिन वाढीच्या दरात सुमारे 47 टक्के घट करतात.”

You might also like