Face Recognition System | बंद होणार फेस रेकग्निशन सिस्टम, Facebook ची घोषणा ! कोट्यावधी लोकांचा डेटा करणार डिलीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–   Face Recognition System | फेसबुकवर जर तुम्ही फेस रेकग्निशन सिस्टमचा (Face Recognition System) वापर करत असाल तर तुम्ही लवकरच या सिस्टमचा वापर करू शकणार नाही. फेसबुकने (Facebook) म्हटले आहे की, ते चेहरा ओळणारी प्रणाली बंद करणार आहेत आणि एक अरबपेक्षा सुद्धा जास्त लोकांचे फेसप्रिंट नष्ट केले जाणार आहेत.

 

फेसबुकची नवीन पॅरेंट (होल्डिंग) कंपनी ’मेटा’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे उपप्रमुख जेरोम पेसेंटी यांनी मंगळवारी पोस्ट केलेल्या ब्लॉगनुसार,
तंत्रज्ञानाच्या इतिहासात चेहरा ओळखण्याच्या वापरण्याच्या दृष्टीने हे पाऊल सर्वात मोठा बदल असेल.

 

पोस्टनुसार, फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त लोकांनी आमची चेहरा ओळणारी सेटिंग स्वीकारली आहे आणि ती ओळखण्यात यशस्वी ठरली आहे.
परिणामी एक अरबपेक्षा जास्त लोकांचे चेहरे ओळण्याचे टेम्प्लेट नष्ट केले जातील.

 

कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, फेसबुकच्या रोजच्या सक्रिय यूजर्सपैकी एक तृतीयांपेक्षा जास्त किंवा 600 मिलियनपेक्षा
जास्त अकाऊंटने फेस रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा (Face Recognition System) वापर पर्याय निवडला आहे.
फेसबुकची नवीन पॅरेंट (होल्डिंग) कंपनी मेटामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे उप प्रमुख जेरोम पेसेंटी यांनी मंगळवारी पोस्ट केलेल्या ब्लॉगनुसार,
तंज्ञानाच्या इतिहासात चेहरा ओळखण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असेल.

आम्ही फेसबुकवर फेस रेकग्निशन सिस्टम बंद करत आहोत. ज्या लोकांनी याची निवड केली आहे.
त्यांचे आता फोटो आणि व्हिडिओमध्ये ऑटोमेटिकली रेकग्निशन केले जाणार नाही आणि आम्ही एक अरबपेक्षा जास्त लोकांच्या व्यक्तीगत फेशियल रेकग्निश टेम्प्लेट हटवले जातील.

 

मात्र, फेसबुकच्या पावलाने ऑटोमेटिक ऑल्ट टेक्स्ट टेक्नॉलॉजी प्रभावित होईल, ज्याचा वापर कंपनी नेत्रहीन लोकांच्या ओळखीसाठी करते.

 

Web Title : Face Recognition System | facebook shut down face recognition system says we will delete more than a billion people photos and videos meta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | दिवाळीच्या एक दिवस अगोदर सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण, आज 3,000 पर्यंत स्वस्त मिळतेय

Pune Crime | वाद मिटविण्यासाठी गेलेल्यांवर कोयत्याने वार; विश्रामबाग पोलिसांकडून 5 जणांना अटक

Pune Crime | पुण्यात अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी; शरीरसुखाची मागणी करणार्‍या फोनवरुन प्रकार उघडकीस