‘फेसबुक’वरील जाहिरातीमुळं कंटाळलात ! आता तुम्ही देखील ‘कंट्रोल’ ठेऊ शकता, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम : केंब्रिज अनॅलिटीका फेसबुक डेटा प्रकरणानंतर फेसबुक जाहिराती आणि युजर प्रायव्हसी विषयी सावध झाले आहे. या प्रकरणानंतर कंपनीने इंटरफेस पासून ते डेटा व युजर पॉलिसीमध्ये अनेक छोटे-मोठे बदल केले आहेत. आता तुम्ही तुमच्या डेटाची माहिती पहिल्यापेक्षा सहजपणे मिळवू शकता.

फेसबुकने काही नवीन बदलांची घोषणा केली आहे. हे बदल Why am I seeing this ad या सेक्शनमध्ये दिसतील. याचा उद्देश युजर्सना जास्त पारदर्शकता आणि नियंत्रण देणे हा आहे. म्हणजे फेसबुकवर कोणतीही जाहिरात दाखवली जात असताना Why am I seeing this ad या पर्यायाचा वापर करता येऊ शकतो. हा पर्याय या आधी देखील उपलब्ध होता पण यामध्ये आता काही नवीन फिचर ऍड केले आहेत.

Why am I seeing this ad या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ही जाहिरात कोणत्या आधारावर तुम्हाला दाखवली जात आहे, याची माहिती मिळेल. तुमची आवड आणि जाहिरात जुळून येते का नाही हे देखील तुम्हाला पहायला मिळेल. एवढेच नाही तर ही जाहिरात कोठून आली तसेच डेटा ब्रोकर्स कोण आहेत, कोणती कंपनी आहे जी तुमच्या आवडीवरून तुम्हाला जाहिरात दाखवत आहे याची देखील तुम्हाला माहिती मिळेल.

फेसबुकच्या या नव्या फीचरचा वापर करून तुम्हाला न आवडणाऱ्या जाहिराती ब्लॉक करू शकता. हे फिचर फेसबुकपेक्षा युजर्सला जास्त फायदेशीर ठरेल. फेसबुक जवळपास जाहिरातीवरच आधारित आहे. या जाहिरातींमुळेच फेसबुक युजर्सना मोफत सेवा देऊ शकतो. हे सर्व काही फेसबुक तुमची परवानगी घेऊन करते.

फेसबुकने Ad preference सेक्शनमध्ये एक नवीन पर्याय ऍड केला आहे. हा नवीन पर्याय Advertisers and business चा आहे. याचा वापर करून काही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. या सेक्सशनचा अपर करून कोणता थर्ड पार्टी ब्रोकर तुमच्या वैयक्तीक आवडी निवडी ओळखून तुम्हाला जाहिरात दाखवत आहे याची माहिती मिळते.

तुम्ही थर्ड पार्टी ब्रोकरच्या जाहिराती ब्लॉक करू शकता पण जाहिराती पूर्णपणे बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like