Facebook आणि EST समूह भारतीय स्टार्टअपमध्ये करणार 1,770 कोटींची गुंतवणूक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज अमेरिकन कंपनी फेसबुक आणि स्वित्झर्लंडचा ईएसटी समूह हे दोन्ही भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार Facebook आणि EST समूह भारतीय स्टार्टअपमध्ये करणार 1,770 कोटींची गुंतवणूक !
आहेत. गुंतवणूक करण्यासाठी फेसबुकने टेक स्टार्टअपची निवड केली आहे, तर ईएसटी समूहाचा जोर आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्समधील गुंतवणूकीवर आहे.

ईएसटी समूहाने शुक्रवारी सांगितले की, पुढील 18 महिन्यात बिजनेस मॉडेल आणि फिनटेक क्षेत्राशी निगडीत भारतीय स्टार्टअपमध्ये तब्बल 1770 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे. भारतीय बाजारात तेजी येण्याचा समूहाला पूर्ण विश्वास आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मंदीच्या या काळात बाजारात नवीन संधी उपलब्ध केल्या जायला हव्यात. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक सिंधू भास्कर म्हणाले, “भारतीय बाजारातील सर्वात महत्त्वाची संपत्ती तेथील बौद्धिक आणि शिक्षित नागरिक आहेत आणि समस्या असणाऱ्या भागात यांचा वापर नाविण्यपूर्ण करण्यासाठी करायला हवा. हे नंतर भांडवल निर्मितीमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.

पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करून त्यांना मोठ्या इकोसिस्टीमवाल्या प्लॅटफॉर्मशी जोडण्याची समूहाची योजना आहे जी अर्थव्यवस्थेतील वृद्धीला गती देण्यात मदत करेल. याशिवाय वित्त बाजार, बँक संचालन, वेल्थ मॅनेजमेंटशी संबंधित आर्टीफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्नींग आणि ब्लॉकचेन टेक्निकमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आहे.

दुसरीकडे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले, “भारतातील इंजिनिअरिंग प्रतिभेला पुढे आणण्यासाठी कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करेल.” स्टार्टअप इकोसिस्टीमवर आधारीत कार्यक्रमात बोलाताना त्यानी म्हटलं की, “त्यांची कंपनी नाविन्याअंतर्गत देशातील जवळपास 2 लाख महिला उद्योजकांना आपल्या सोबत जोडत आहे, जे रोजगार वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आता एकूण स्टार्टअपमध्ये महिला संस्थापकांची संख्या 9-10 टक्के आहे जी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”