अवघ्या काही रुपयांतच विकला जातोय फेसबुक, जीमेलचा युजरनेम-पासवर्ड

 लंडन : वृत्तसंस्था
सोशल मीडियाचा वापर करणे दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब कंपनीने उघड केली आहे.
केवळ फेसबुकच नाही तर जीमेल आयडीचा  पासवर्ड  केवळ २०० रुपयांत दिला जात असल्याचे या कंपनीने सांगितल्याने जगभरातील युजर्समध्ये मोठी खळबळ माजली आहे. ७१ हजार रुपयांत त्या व्यक्तीची सर्व ऑनलाईन माहिती मिळत असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e990fa5-c7b8-11e8-943d-db70a144a7dc’]
डार्क वेबवर एखाद्या व्यक्तीच्या केवळ फेसबुक किंवा जीमेलच नाही तर त्याच्या सर्व ऑनलाईन सोशल मिडियावरील माहितीशिवाय ऑनलाईन शॉपिंग आणि बँकेची माहितीही पिनकोडसह मिळत आहे. यासाठी काही प्रमाणात पैसेही मोजावे लागतात, असा सनसनाटी दावा कंपनीने  केला आहे.
या विक्रीमध्ये इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या वेबसाईटचाही डेटा विकला जातो. ट्विटरवर ३. २६  डॉलर म्हणजेच २४०  रुपये आणि ६. ३० डॉलर म्हणजेच  ४६० रुपयांना विकली जाते.
डार्क वेब म्हणजे काय?
इंटरनेटच्या मागे जी माहिती साठविली जाते किंवा जी प्रक्रिया चालते ती आपण पाहू शकत नाही. याला डार्क वेब म्हणतात.  आपण जे इंटरनेट वापरतो तो वेबच्या एकूण जगाचा फारच लहान भाग आहे. आपण जे इंटरनेटवर पाहतो ते केवळ ४ टक्के आहे. उर्वरित ९६ टक्के इंटरनेट हे डार्क वेबमध्ये येते. यावर जगभरातील हॅकर्सचा डोळा असतो. ही माहीत चोरल्यानंतर ती विकली जाते. डार्क वेब हे साध्या ब्राऊजरवर दिसत नाही. त्यासाठी टॉर ब्राऊजर लागतो. त्यांना ट्रॅक करणे जिकीरीचे आहे. यामध्ये हॅकिंग केले जाते. पैसे दिल्यावर सर्व माहिती मिळते.
डार्क वेबची सुरुवात कधी झाली?
डार्क वेबची सुरुवात १९९० च्या दशकात झाली. अमेरिकी लष्करानं त्यांची गोपनीय माहिती कुणाच्या हाती लागू नये यासाठी डार्क वेबची सुरुवात केली.
[amazon_link asins=’B010U37EM8,B01940U1SW,B003Z93P2S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbdeca87-c7b8-11e8-baa3-f7f932c53ec1′]
फसवेगिरी करणारे सुद्धा डार्क बेव वापरत असतात. इथं खोटे पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना आणि इतर आयडी प्रुफसुद्धा मिळतात.भारतात डार्क वेबशी लढण्यासाठी विशेष कायदा नाही.
Loading...
You might also like