आता फेसबुक देखील तुमचा ‘आजार’ ओळखणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता फेसबूक आपल्या मानसिक आरोग्याबाबत देखील माहिती देऊ शकते. फेसबूक या बाबतची माहिती देऊ शकते की त्याचा यूजर आजारी आहे का नाही. ऐकायला तुम्हाला थोडे वेगळे वाटले असे परंतू हे खरे असून फेसबूकच्या युजर्सला हे उपल्बध झाले आहे. जर तुम्हाला डॉबेटीस असेल आणि दुसरा मानसिक आजार असेल तर आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून याची माहिती देण्यात येईल.

वैज्ञानिकांनी सांगितले की यूजरच्या सोशल मिडिया पोस्टला शारिरिक लक्षणांसारखे पाहिले जाऊ शकते. अमेरिकेच्या पेंसिल्वेनिया आणि स्टोनी ब्रुक युनिवर्सिटीच्या संशोधकांनी ऑटोमेटिड डाटा कलेक्शन तंत्रज्ञानामुळे 10000 रुग्णांच्या फेसबुक पोस्टच्या हिस्ट्रीचा अभ्यास केले. यात सर्व युजरच्या फेसबूक पोस्टचा अभ्यास करण्यात येईल.

संशोधकांनी या रुग्णांना त्याचे इलेक्ट्रोनिक मेडिकल रेकॉर्ड आणि प्रोफाइलला लिंक करण्याची परवानगी घेतली आहे. त्यासाठी संशोधकांनी विश्लेषणासाठी तीन मॉडेल बनवले आहेत आणि शोध घेतला. यात एक मॉडेलमध्ये यूजर्सच्या फेसबूक पोस्टवरील भाषेचे विश्लेषण केले आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये वय आणि रुग्णाचे लिंग या महितीचे देखील विश्लेषण केले आणि तिसऱ्या मॉडलमध्ये या दोन्ही मॉडेलचे मिळून विश्लेषण करण्यात आले.

खरंतर आपण फेसबूकवर आपल्या बद्दल अनेक बाबी टाकत असतो. या पोस्ट वरून व्यक्तिच्या मनात काय चालू आहे. याबाबींची माहिती मिळू शकते. संशोधकांने देखील हेच केले. आपल्याला माहित आहे की आपली जीवन शैली काय आहे, आपण दिवसभरात काय करतो काय नाही हे सर्व काही बऱ्याचदा पोस्ट करत असतो. तर काही वेळा आपण आपल्या आजाराबाबत पोस्ट करत असतो. याचाच वापर करुन संशोधकांनी रुग्णांच्या आजाराबाबत माहिती दिली.

आरोग्य विषयक वृत्त –

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स

शाकाहारी व्यक्तींनी ” प्रोटीन आणि व्हिटॅमिन ” वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

चांगली झोप येत नाही ? करा हे उपाय

अहो आश्चर्यम ! ८४ वर्षाच्या आजी करतात ‘योगा’