फेसबुकचा आणखी डाटा लीकच्या घटना घडू शकतात

फेसबुकचे सर्वेसर्वा झुकरबर्ग यांचाही डाटा झाला लिक

सॅनफ्रान्सिस्को : भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ही प्रकरणं कंपनीच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवू शकतात. फेसबुकने अमेरिकेच्या सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या रिपोर्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

विशेष म्हणजे फेसबुकचे सर्वेसर्वा झुकर्सबर्ग यांचाही  डेटा चोरी झाल्याचे समोर आले आहे़ अमेरिकेच्या संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटलं की, ज्या युजर्सचा डेटा चुकीच्या पद्दतीने ब्रिटिश पॉलिटिकल कन्सल्टन्सी फर्मबरोबर शेअर केला त्यामध्ये माझंही नाव होते, असे ते म्हणाले.

फेसबुककडे असलेल्या डाटाचा त्यांची सहकंपनी कॅब्रिज अ‍ॅनालिटीकाने दुसºयांना विकल्याचे उघड झाल्याने जगभर खळबळ माजली होती़ याप्रकरणी झुकरबर्ग यांना जाहीर माफीही मागावी लागली होती़ कॅब्रिज अ‍ॅनालिटीकाची मदत घेतल्याचा आरोपप्रत्यारोपाने भारतातील राजकारणही गरम झाले आहे़ असे असतानाच आता अमेरिकेच्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनचा हा नव्या रिर्पोटने पुन्हा एकदा फेसबुक युजर्समध्ये खळबळ उडाली आहे़

युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व माहितीची पडताळणी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते आहे. डेटाचा चुकीचा वापर थांबविण्यासाठी याचा फायदा होईल, असं कंपनीने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.फेसबुकनुसार, मीडिया आणि थर्ड पार्टीकडून घटना आणि संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत.

डेटा लिकसारख्या आणखीही घटना समोर येऊ शकतात, असा इशारा फेसबुकने गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनीच्या धोरणांविरोधात डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. निवडणुकीसाठीची कॅम्पेन, जाहिराती आणि चुकीच्या सूचना पसरविण्यासाठी डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.

डेटा लीकसारखी घटना पुन्हा घडली तर युजर्सचा कंपनीवरील विश्वास कमी होईल तसेच ब्रॅण्ड इमेजवरही फरक पडेल परिणासी व्यावसायावर याचा परिणाम होइल. डेटाचा चुकीचा वापर केल्यामुळे आपल्या पुढील कारदेशीर गोष्टीही वाढत जातील त्यामुळे दंड भरायला लागल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.