आठ कोटी 70 लाख फेसबुक युजर्सच्या डेटाचा गैरवापर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
फेसबुकच्या केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे ‘आपला खासगी डेटा सुरक्षित आहे का’?असा प्रश्न जगभर उपस्थित होत आहे. या संदर्भात फेसबुकने स्पष्टीकरण देताना,सुमारे आठ कोटी 70 लाख युजर्सची डेटा चोरी झाल्याचे मान्य केले. या युजर्समध्ये बहुतेक सर्व अमेरिकन युजर्स असल्याची माहिती त्यांनी दिली. केम्ब्रिज अनालिटिकाने फेसबुक युजर्सचा खासगी डेटा अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत वापरल्याचा आरोप केला आहे.

फेसबुकचा अधिकारी माईक स्क्रोफरच्या मते, “ केम्ब्रिज अनालिटिकाने आठ कोटी 70 लाख लोकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने शेअर केला.’ मात्र सध्या युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी फेसबुकने आता कठोर पावले उचलली आहेत.

फेसबुकने नुकतेच ‘प्रायव्हसी टूल्स’ नावाची सुविधा देण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली. यासोबत केंब्रिज अनालिटिकासोबत कोणताही डेटा शेअर झाला असेल, तर त्याची माहिती युझर्सला देण्याचे आश्वासनही स्क्रोफरने दिले.