Facebook कडून लवकरच ‘डेटिंग’ फिचर, ‘या’ देशात सेवा सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी सोशल मिडिया कंपनी म्हणून ओळख असलेल्या फेसबूकने डेटिंग फिटर सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या यूजर्ससाठी फेसबूक ही विशेष सेवा आणणार आहे. अमेरिकेत फेसबूकने डेटिंग फिचर सुरु देखील केले आहे. हे फिचर आणि त्याची विशेषता मे महिन्यातच सादर करण्यात आली होती. हे डेडिंग फिचर फेसबूकच्या मुख्य अ‍ॅपवरच असेल. परंतू लोक याला फेसबूकच्या मालकीच्या असलेल्या इंस्टाग्रामवरुन देखील वापरू शकतात किंवा कनेक्ट होऊ शकतात.

अशी ही चर्चा आहे की 2019 च्या अखेरीस इंस्टाग्राम स्टोरीजला डेटिंग प्रोफाइलवर शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. फेसबूकची हे डेटिंस सर्विस पहिल्यापासून उपलब्ध असलेल्या अ‍ॅपमधूनच वापरात येईल.

फेसबूकच्या डेटिंग सर्विसचा फायदा हा होईल की तुमच्या इंस्टाग्राम फॉलोअर्स आणि फेसबुक फ्रेंड्समधून आपला मॅचिंग निवडता येईल. भारतात हे फिचर लॉन्च करण्यात येईल, परंतू हे फिचर भारतात कधीपर्यंत लॉन्च करण्यात येईल हे अजून स्पष्ट करण्यात आले नाही.